मुंबई : 'बिग बॉस मराठी'चा माजी स्पर्धक आणि राजकारणी अभिजीत बिचुकले 'बिग बॉस 15' मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. वाइल्ड कार्ड म्हणून त्याची एन्ट्री ताज्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आली आहे. आता तो घराघरात कोणती समीकरणं तयार करणार आहे हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवोलिना भट्टाचार्जी या शोमध्ये शमिता शेट्टीला टार्गेट करताना दिसत आहे. आणि राखी सावंत तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांना टोमणे मारताना दिसत आहे. अभिजीतने घरात प्रवेश करण्यापूर्वीच सांगितलं आहे की, तो शो अधिक मनोरंजक बनवेल आणि जर त्याला पाठिंबा मिळाला तर तो या सीझनचा विजेता होईल. 



अभिजित बिचुकलेची उत्तरं आणि वृत्ती यावर सलमान खान विशेष खूश दिसला नाही. याशिवाय, सूत्रांवर विश्वास ठेवला तर पारस छाबरा आणि विशाल कोटियन देखील वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करू शकतो. पण चॅनलकडून काहीही दुजोरा मिळालेला नाही.