Abhishek - Aishwarya Rai Bachchan Rumors Divorce : गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या समोर येत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक हे वेगळे झाले असून लवकरच घटस्फोट घेणार अशा आशयाचा बातम्या पुन्हा जोर धरत आहेत. अनेक ठिकाणी, सोहळ्यात बच्चन कुंटुंब वेगळं आणि ऐश्वर्या आपल्या लेक आराध्यासह दिसून आली आहे. त्यामुळे या बातम्यांमध्ये तथ्य असेल असं चाहत्यांनाही वाटत आहे. कधी अभिषेक तर कधी ऐश्वर्या यांच्या बोटातील साखरपुडाची अंगठी दिसली नाही, असं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यानंतर सोशल मीडियावर अभिषेकचं घटस्फोटासंदर्भातील एका पोस्टला लाइक करणे, त्यामुळे चाहत्यांना भुवया उंचावल्यात. पण आता Reddit वर एक पोस्ट व्हायरल होतय, ज्यात ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे होण्यामागे अभिषेकने ऐश्वर्याला फसवलं असं लिहिलण्यात आलंय. 


अभिषेकने या अभिनेत्रीसाठी ऐश्वर्याला फसवलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका Reddit वापरकर्त्याने हल्लीच सांगितलं की, अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्यात अंतर निर्माण झालंय. इतकंच नाही तर त्यात जे काही लिहिलं आहे त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या Reddit वापरकर्त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'ऐश आणि अभिषेक हे बऱ्याच काळापासून वेगळे आहेत आणि याचं कारण म्हणजे अभिषेकने आपल्या पत्नीची फसवणूक केली आहे.



होय, यासोबतच युजरने या अभिनेत्रीचे नावही सांगितले आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची 'दसवीं' को-स्टार निम्रत कौर आहे. अशा परिस्थितीत, जेव्हापासून ही पोस्ट्स समोर आल्या आहे, तेव्हापासून चाहत्यांना त्यात किती तथ्य आहे हे जाणून घ्यायचंय. 




या Reddit वापरकर्त्याने असंही लिहिलंय की, ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या हे बच्चन कुटुंब आणि अभिषेक यांच्यापासून बऱ्याच काळापासून दूर राहत आहेत. या दोघेही अभिनेत्रीच्या आईच्या घरी राहत आहेत. काही काळापासून ऐश तिच्या आईच्या वाढदिवशी अवॉर्ड घेण्यासाठी तिच्या मुलीसोबत सगळीकडे एकटीच फिरत होती. अभिनेत्रीच्या आईच्या वाढदिवसालाही अभिषेक तिथे उपस्थित नसल्याचा पाहिला मिळालं. 



निम्रत कौरसाठी ऐश्वर्याची फसवणूक? 


यासोबतच Reddit यूजरमध्ये असेही लिहिले आहे की, ऐश्वर्या बऱ्याच दिवसांपासून तिच्या तब्येतीने त्रस्त आहे. तिच्या काही आरोग्य समस्यांमुळे तिला वजन कमी करणे कठीण जात आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलं जात आहे की, अभिषेक आणि ऐशमध्ये गोष्टी खराब होऊ लागल्या जेव्हा अभिनेत्याने 'दसवीं' च्या सेटवर निम्रत कौरसोबत पत्नीची फसवणूक केली. अभिषेकला आपली चूक कळली असून त्याने निम्रतपासून सध्यातरी दुरावले असले तरी तो तिच्यापासून वेगळा झाला असून लवकरच घटस्फोटाकडे वाटचाल करणार आहे, असं यात म्हटलंय.