Abhishek Bachchan and Aishwaryra Rai Come Together : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून रंगली आहे. या सगळ्यात अशी माहिती समोर येत आहे की जी ऐकूण त्या दोघांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. असं म्हटलं जात आहे की लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम कथितपणे एक नवा हिंदी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात अभिषेक आणि ऐश्वर्या रायला महत्त्वाच्या भूमिकेत कास्ट करण्याचा ते विचार करत आहेत. मणिरत्नम यांच्यासोबत या आधी दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्या दोघांनी 'गुरु' या चित्रपटात एकत्र स्क्रीनवर दिसले होते. दरम्यान, खासगी आयुष्यातील सगळ्या गोष्टी विसरून ते दोघं प्रोफेश्नली एकत्र येऊन चित्रपटासाठी काम करणार असं म्हटलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मणिरत्नम यांच्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुरु' या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकत्र दिसले होते. त्या दोघांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीनं सगळ्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर मणिरत्नम यांनी त्यांना 'रावण' मध्ये पुन्हा एकदा कास्ट केलं होतं. टाइम्स नाव डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, मणिरत्नम हे त्यांच्या या चित्रपटातून तिसऱ्यांदा या दोघांना एकत्र घेऊन येणार आहे. 


अभिषेक बच्चनचा मणिरत्नम यांच्यासोबत हा चौथा चित्रपट असणार आहे. या आधी त्यानं मणिरत्नम यांच्यासोबत 'युवा' चित्रपटात काम केलं होतं. मणिरत्नम यांच्यासोबत त्यांचं नातं कसं आहे याविषयी त्यानं झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की 'जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला युवासाठी साइन केलं होतं, तेव्हा ते पहिल्यांदा आमच्याघरी आले होते. त्यावेळी मला वाटलं होतं की ते माझ्या वडिलांना (अमिताभ बच्चन) साइन करण्यासाठी आले होते. जेव्हा मला कळलं की ते मला साइन करण्यासाठी आले आहेत तेव्हा मला खूप आनंद झाला. कोणताही अभिनेता मणिरत्नम यांच्यासोबत काम करण्यासाठी काहीही करण्यास तयार होईल. मला या गोष्टीचा अभिमान आहे की त्यांच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची त्यांनी मला तीन वेळा संधी दिली आणि मी त्या योग्य आहे असं त्यांना वाटलं.'


हेही वाचा : सलमान खाननंतर आता Vikrant Massey ला मिळाली धमकी; गुजरात कनेक्शन समोर


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे की अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार आहेत. त्या दोघांमध्ये दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, त्यांच्यात दुरावा येण्याचं कारण अभिनेत्री निम्रत कौर असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, निम्रतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सिंगल महिलांना फिरण्याच्या काही टिप्स दिल्या.