Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन अर्जुनच्या भूमिकेत दिसत आहे. ज्यामध्ये त्याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. अशातच अर्जुनला अचानक माहिती होते की तो कॅन्सरने ग्रस्त आहे. त्याला जगण्यासाठी फक्त 100 दिवस उरले आहेत. यानंतर अर्जुनच्या मूत्यूची लढाई सुरु होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता अभिषेक बच्चनने 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाच्या निमित्ताने पत्नी ऐश्वर्या रायचे कौतुक केले आहे. द हिंदूशी बोलताना अभिषेकने जया बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या रायचं कौतुक केलं आहे. ज्यामध्ये तो म्हणाला की, माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईने अभिनय करणं बंद केलं. कारण तिला आपल्या मुलांसोबत वेळ घालवायचा होता. माझ्या आईने बाबांचे जवळ नसणे हे कधीच आम्हाला भासू दिलं नाही. त्यावेळी आम्हाला वाटायचं की, बाबा त्यांचे काम करून रात्री घरी येतात. 


अभिषेककडून ऐश्वर्याचं कौतुक


गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या अफवांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मात्र, अशातच आता अभिषेकने ऐश्वर्या रायचं नाव घेऊन ऐश्वर्याचं कौतुक करून घटस्फोटांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, मी खूप नशीबवान आहे. मी बाहेर जाऊन चित्रपट करू शकलो. कारण ऐश्वर्या राय घरी आराध्यासोबत आहे. त्याबद्दल मी ऐश्वर्या रायचा खूप आभारी आहे. एक पालक म्हणून तुमची मुलं तुम्हाला खूप प्रेरणा देत असतात. आई-वडील मुलांसाठी एका पायाने डोंगरही चढू शकतात. मी हे आई आणि इतर स्त्रियांबद्दल खूप आदराने सांगतो. कारण ते जे करतात ते कोणीही करू शकत नाही.


वडील आपल्या मुलांची सगळी कर्तव्ये एकदम शांतपणे करतात. ते कधीच त्यांच्या कर्तव्याचा देखावा करत नाहीत. पुरषांच्या बाबतीत हीच कमतरता आहे. जस-जसे मुलांचे वय वाढत जाते तसे आपल्या मुलांना आपले वडील किती कणखर आहेत हे समजते. वडील नेहमी मुलांच्या सोबत असतात.