मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चनने त्याची मुंबईतील एक मालमत्ता विकली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या लक्झरी ओबेरॉय 360 वेस्ट टॉवर्समध्ये 37व्या मजल्यावर एक आलिशान फ्लॅट होता. हा फ्लॅट अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांनी 2014 मध्ये 41 कोटी रुपयांना खरेदी केला होता. बातमीनुसार, हा फ्लॅट 45.75 कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा एक अतिशय प्रशस्त आणि आलिशान फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट एरिआ 7527 चौरस फूट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नव्हे तर ज्या अपार्टमेंटमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचा फ्लॅट होता त्याच अपार्टमेंटमध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि अक्षय कुमारने देखील फ्लॅट घेतला आहेत. मीडिया रिपोर्टनुसार शाहिदने 56 कोटी आणि अक्षयने 52.5 कोटी रुपये खर्च करून येथे फ्लॅट घेतले आहेत. बॉलिवूड स्टार्सने प्रॉपर्टी खरेदी केल्याच्या बातम्या सतत बाहेर येत आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की, राणी मुखर्जीने मुंबईतील खार परिसरातील एका इमारतीत स्वतःसाठी एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.


या फ्लॅटची किंमत 7.12 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर दिशा पटानीने एक मालमत्ता देखील खरेदी केली आहे. या मालमत्तेची किंमत 5.95 कोटी असल्याचं सांगितलं जातं. दिशा आणि राणीने खरेदी केलेली मालमत्ता सीफेस आहे. मात्र, जर आपण अभिषेक बच्चनबद्दल बोललो तर अभिषेक नुकताच 'बिग बुल' चित्रपटात दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई करु शकला नाही. त्याचवेळी, जर आपण अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोललो तर अभिषेक बच्चन 'दसवी' आणि 'बॉब बिस्वास' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.