Abhishek Bachchan Liked Divorce Post : बऱ्याच काळापासून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात दुरावा आल्याचे म्हटले जाते. अशा अफवाह सुरु झाल्या आहेत की ते दोघं घटस्फोट घेत आहेत. खरंतर त्या दोघांनी या बातम्यांवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवाह तेव्हा सुरु झाल्या जेव्हा अनंत आणि राधिकाच्या लग्नात ते वेगवेगळे आले. त्यांनी एकत्र कोणतेही फोटो क्लिक केले नाही. मात्र, लग्नातील एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात अभिषेक हा त्याची पत्नी ऐश्वर्या आणि लेक आराध्यासोबत दिसला. या सगळ्यात अभिषेक बच्चनची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक बच्चननं ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्याच्या चर्चांमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट लाइक केली आहे. या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिषेकनं लाइक केलेल्या या पोस्टमध्ये घटस्फोट घेतानाचा कठीण काळ आणि ग्रे घटस्फोटच्या ट्रेंडवर चर्चा करण्यात आली होती. ही पोस्ट लेखिका हीना खंडेलवालनं शेअर केली होती. ज्यात असं लिहिलं होतं की 'जेव्हा प्रेम हे सोपं राहत नाही. ज्या जोडप्यांचं लग्न झालं आहे ते आता विभक्त झाले आहेत. कोणत्या गोष्टी त्यांना हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडतात आणि ग्रे घटस्फोट का वाढतोय?'



त्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की "घटस्फोट हा कोणासाठीच सोपा नसतो. कायम आनंदी राहण्याचं स्वप्न कोण पाहत नाही? कोण आहे जो सोशल मीडियावर वृद्ध लोकांचा हात धरून रस्ता ओलांडतानाच्या व्हिडीओला रिक्रिट करण्याचा विचार करत नाही? पण कधी-कधी आयुष्य हे तसं नसतं जसा आपण विचार करतो. पण जेव्हा लोकं तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग ठरतात आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून राहिल्यानंतर विभक्त होतात, तर ते या सगळ्याचा सामना कसं करत असतील? त्यांना रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात आणि त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो? ही पटकथा त्याच गोष्टींना दर्शवते. त्यामुळे ग्रे घटस्फोट आणि सिल्वर स्प्लिटर्स जगभरात वाढत आहेत. ग्रे डिव्हॉर्सचा अर्थ साधारपणे 50 वर्षांचे झाल्यानंतर जेव्हा जोडपं विभक्त होण्याचा निर्णय घेतं त्याला म्हणतात. खरंतर कारण वेगवेगळी असतात, पण आश्चर्याची गोष्ट नाही." 



हेही वाचा : अभिनय क्षेत्रात सचिनच्या लेकीचं पदार्पण? शूटिंगमधील व्हिडीओ व्हायरल!


दरम्यान, अभिषेक बच्चननं देखील ही पोस्ट लाइक केली आहे. खरंतर अभिषेक बच्चननं ही पोस्ट लाइक केल्यानं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. इतकंच नाही तर स्वत: हीना खंडेलवाल यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून याचा एक स्क्रिन शॉट शेअर केला आहे. त्यावरून अनेकांनी हा अंदाज बांधला आहे की अभिषेक आणि ऐश्वर्याचं नातं खराब झाल्यामुळे त्यानं ही पोस्ट लाईक केली आहे.