मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे 2007 मध्ये लग्न झाले आहे. त्यानंतर 2011 मध्ये त्यांच्या घरी मुलगी आराध्याचा जन्म झाला. आता हे जोडपं एकमेकांसोबत आनंदाने सुखाचा संसार करत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडते. ते बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात आवडतं जोडपं देखील आहे. या दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डींग पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु एका मुलाखतीत खुद्द अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा केला आहे. जे ऐकून सर्वच लोकं आश्चर्यचकित झाले आहेत.


अभिषेक बच्चन प्रत्येक प्रसंगात ऐश्वर्या रायला सपोर्ट करताना दिसतो. अभिनेत्याने एका मुलाखत त्याने ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर आयुष्यात झालेल्या बदलाबद्दल सांगितले. यादरम्यान अभिषेक म्हणाला होता, 'ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर माझ्या आयुष्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला आहे. तिने माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे, जो मी यापूर्वी स्वत:मध्ये कधीही पाहिला नव्हता. मी माझ्या घरतील सर्वांचा लाडका आहे. माझ्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती पण लग्नानंतर मला जबाबदारीची जाणीव होते.'


अभिषेक म्हणाला होता की, 'ऐश्वर्या आंतरराष्ट्रीय स्टार आहे. जगभरातील लोक तिला ओळखतात, तरीही त्याच्याबद्दल तिला कोणताही अहंकार नाही. ती लोकांशी अतिशय नम्रतेने वागते.'


पुढे अभिषेकने असेही म्हटले की, 'ऐश्वर्याच्या अश अनेक सवयी आहेत ज्या अमिताभ बच्चन यांच्या सारख्या आहेत जसे की ते दोघेही स्वतःला कोणत्याही मोठ्या स्टारसारखे प्रोजेक्ट करत नाहीत. दोघांचेही फक्त त्यांच्या कामावर लक्ष असतं.'


सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय एक सारखे असल्याचा अभिषेकच्या वक्तव्यामुळे लोकांना आश्चर्य वाटलं आहे.