Abhishek Bachchan on 2nd Child : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्य घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दोघं त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. पण या अफवांना घेऊन कोणी काही उत्तर किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. या सगळ्यात अभिषेक बच्चन हा अभिनेता रितेश देशमुखचा शो केस तो बनता है मध्ये दिसला होता. त्यावेळी त्यानं ऐश्वर्यासोबत त्याच्या दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगवर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, शो दरम्यान रितेशनं 'ए' विषयी विचारलं की जो बच्चन कुटुंबाच्या जवळपास सगळ्या सदस्यांची नावं ही 'ए' पासून सुरु होता. अमिताभ जी, ऐश्वर्या, आराध्या आणि तू अभिषेक. सगळ्यांची नावं 'ए' अक्षरानं सुरु होतं. तर जया काकू आणि श्वेतानं असं काय चुकीचं सांगितलं? त्यावर अभिषेकनं हसत उत्तर दिलं की हे तुलाच तिला विचारावं लागेल, पण मला वाटतं की आमच्या घरी एक परंपरा आहे. 



त्यानंतर लगेच रितेशनं अभिषेकसोबत मस्ती करत म्हटलं की आराध्यानंतर? त्यावर उत्तर देत अभिषेक म्हणाला, नाही, आता पुढची पिढी येईल ते बघतील ना. त्यानंतर रितेशनं त्याला थेट दुसरं बाळं होण्याची काही शक्यता आहे का असं थेट विचारलं? त्यावर आश्चर्यचकीत होईल अभिषेक लाजला आणि या सगळ्या चर्चांवर पूर्णविराम देत म्हणाला, रितेश, जरा वयाचा विचार कर. त्यानंतर रितेश हसतो आणि अभिषेकचा पाया पडतो. 


अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची लेक आराध्या आहे. आराध्या ही 13 वर्षांची आहे. तर ऐश्वर्या आणि अभिषेकविषयी बोलायचे झाले तर अनंत अंबानीच्या लग्नाच्या पार्टीमध्ये ऐश्वर्याही बच्चन कुटुंबापासून दूर झाली. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. हे दोघे नुकतेच एका पार्टीमध्ये पोज देताना दिसले, ज्यामुळे या सगळ्या अफवांवर पूर्णविराम लागला. 


हेही वाचा : 500 कोटीत विकला गेला ईशा अंबानीचा बंगला; कोणत्या अभिनेत्रीनं घेतला?


त्यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर अभिषेक बच्चन हा नुकताच शूजित सिरकारच्या आय वॉन्ट टू टॉकमध्ये दिसणार आहे. तर ऐश्वर्या राय मणिरत्नमच्या मूवी 'पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये दिसली आहे.