Abhishek Bachchan Viral Photo : बॉलिवूडमध्ये (Bollywood) कलाकार आणि त्यांच्या खासगी जीवनासंदर्भात अनेक चर्चांना कायमच उधाण आल्याचं पाहायला मिळतं. एखाद्या सेलिब्रिटीच्या डेटिंगपासून आगदी त्यांच्या विवाहबाह्य संबंधांपर्यंत प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीची चर्चा होते. अगदी नवी कौटुंबीक समीकरणं असो किंवा सेलिब्रिटी मंडळींचे लूक आणि त्यांचा फिटनेस असो, 'चर्चा तर होणारच...' असं म्हणत अनेक विषयांना वाचा फोडली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच एक चर्चेत असणारा विषय म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या काय यांचं वैवाहिक नातं. गेले कैक दिवस अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसत नसल्यामुळं त्यांच्या नात्यात किंबहुना बच्चन कुटुंबात सारंकाही आलबेल नसल्याचं वृत्त प्रकाशझोतात असल्याचं पाहायला मिळालं. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मात्र अजूनही समोर आलेली नाही. याच चर्चांदरम्यान आता अभिषेकचा एक असा फोटो व्हायरल होत आहे, जिथं त्याचं बदललेलं रूप चाहत्यांच्या चिंतेत भर टाकत आहे. 


वाढलेलं वजन, सुटलेलं पोट आणि त्यातच चेहऱ्यावर दिसणारं वाढतं वय यामुळं अभिषेकनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. पण, प्रत्यक्षात तसं नसून, हा फोटो आहे त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर. 'आय वाँट टू टॉक' असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून, याच चित्रपटाचं पोस्टर त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. 'एक फोटो हजारो शब्दांहूनही जास्त बोलका असतो' असं त्यानं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिला जातो. 


हेसुद्धा वाचा : वाढत्या वयाला कसा माराल ब्रेक? 47 व्या वर्षी पंचविशीतल्या दिसणाऱ्या या माणसानं पुरुषांना दिला कानमंत्र 




ज्युनिअर बच्चनचा हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून, त्याचा हा आगामी प्रोजेक्ट नेमका आहे तरी काय याचीच चर्चा आणि उत्सुकताही चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. थोडक्यात सुरुवातीला चिंता वाढवणारा हा फोटो काही क्षणांतच कुतूहलात रुपांतरित होताना दिसत आहे. बिग बींच्या लेकाचा हा फोटो आणि त्याच्या चित्रपटाचा टीझर पाहता प्रेक्षकांना काहीतरी नवं पाहायला मिळणार हेच स्पष्ट होत आहे. 22 नोव्हेंबर रोजी त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, अभिषेकला नेमकं काय बोलायचंय, हेसुद्धा कळणार आहे.