मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या लग्नाआधी अभिषेकचं लग्न त्याच्या आईनं म्हणजे जया बच्चन यांनी कपूर घराण्याची लेक करिश्मा कपूर हिच्याशी ठरले होते. परंतु हे लग्न मात्र काही ठरू शकलं नाही. त्यानंतर करिश्मा कपूरनं (Karishma Kapoor) मोठ्या बिझनेसमनशी लग्न केलं आणि अभिषेकनं 2007 साली ऐश्वर्याशी विवाहबंध झाला आता दोघांना एक मुलगीही आहे. परंतु करिश्मा आणि अभिषेकच्या लग्नाच्या चर्चा आजही होताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर अनेक वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकणार होते, पण असंकाही घडलं ज्यामुळे त्यांचं नातं तुटलं. मात्र, त्यांचं नातं का तुटलं हे अद्याप कोणालाच कळालेलं नाही. आता बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरसोबत नसण्यामागचं कारण सांगितलं आहे.


अभिषेक-करिश्मा हे एकमेकांसाठी बनलेलेच नव्हते
सुनील म्हणाला, 'अभिषेक आणि करिश्मा हे एकमेकांसाठी कधीच बनलेले नव्हते. मात्र, त्यांचं नातं ही अफवा नसून हे एक सत्य होतं. या दोघांचं लग्न होणार होतं. तसंच, सुनीलने सांगितलं की, तो स्वतः करिश्मा-अभिषेकच्या एंगेजमेंटमध्ये सहभागी झाला होता कारण तो कपूर कुटुंबाच्या खूप जवळ होता.


दोघंही सेटवर नेहमीच भांडत असत
सुनील म्हणाला, 'हा मैने भी प्यार किया है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला कळालं की, ते एकमेकांसाठी बनलेले नाहीत. याचं कारण म्हणजे दोघंही सेटवर नेहमीच भांडत असत. मी नेहमी आश्चर्यचकित व्हायचो  की ते खरोखर एकमेकांसाठी बनलेले आहेत की नाही. अभिषेक गोड आहे आणि करिष्माही चांगली आहे. पण कदाचित नशिबाने या दोघांच्याही मनात काही वेगळंच ठेवलं असावं. होय मैने भी प्यार किया है हा एकमेव चित्रपट होता ज्यात अभिषेक आणि करिश्माने एकत्र काम केलं होतं.


2002 मध्ये अभिषेक-करिश्माची एंगेजमेंट झाली
2002 मध्ये, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली. एका इव्हेंटमध्ये जयाने करिश्माला तिची सून म्हणून हाक मारली, जरी 2003 मध्ये ही एंगेजमेंट तुटली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयाची इच्छा होती की लग्नानंतर तिच्या सुनेने चित्रपटात काम करू नये, पण ही अट करिश्मा आणि तिच्या आईला मान्य नव्हती.


2007 मध्ये अभिषेकचं ऐश्वर्यासोबत लग्न झालं 
करिश्मानंतर अभिषेकचे नाव ऐश्वर्या रायसोबत जोडलं गेलं. दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के', 'कुछ ना करो', 'गुरु', 'धूम 2', 'रावण', 'बंटी और बबली' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 14 जानेवारी 2007 रोजी लग्न झाल्यानंतर या जोडप्याने 20 एप्रिल 2007 रोजी मुंबईत लग्न केलं. हे इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या लग्नापैकी एक आहे. या लग्नापासून या जोडप्याला आराध्या नावाची मुलगी आहे.