`सोशल मीडिया` सेन्सेशन दानिशचा वाशीजवळ अपघातात मृत्यू
सोशल मीडिया इन्स्टाग्राम पेजवर दानिशच्या फॉलोअर्सची संख्या १ दशलक्षहून अधिक
मुंबई : सोशल मीडिया 'यूट्यूब'वरून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला आणि एमटीव्हीच्या रिएलिटी शो 'एस ऑफ स्पेस'चा एक स्पर्धक दानिश जेहन अपघाती मृत्यू झालाय. दानिशच्या मृत्यूनं नातेवाईकांसहीत छोट्या पडद्याशी निगडीत अनेकांना धक्का बसलाय. मुंबईच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाशी निगडीत दानिशनं २१ व्या वयातच स्वत:ची वेगळी छाप पाडली होती... सोशल मीडियावर तो खूपच लोकप्रिय ठरला होता.
एका लग्नात सहभागी झालेला दानिश मुंबईत परतत असताना त्याच्या कारचा वाशीजवळ अपघात झाला... यातच त्याचा मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे, सोशल मीडिया इन्स्टाग्राम पेजवर दानिशच्या फॉलोअर्सची संख्या १ दशलक्षहून अधिक आहे.
'बिग बॉस - सीझन ११' फेम प्रोड्युसर विकास गुप्तालाही दानिशच्या जाण्यानं धक्का बसलाय. विकासनं सोशल मीडियावर दानिशला श्रद्धांजली व्यक्त केलीय. 'दानिश तू नेहमीच आमच्याजवळ राहशील' असं विकासनं म्हटलंय.