Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात वाद सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर अंबानी कुटुंबियांच्या लग्नात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय एकत्र न दिसल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, सध्या या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता अभिषेक बच्चनच्या एका गोष्टीमुळे दोघांमध्ये सारंकाही आलबेल सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चनने एक नवीन कार खरेदी केली आहे. अभिषेकने या कारमधून भाचा अगस्त्य नंदा आणि त्याची मैत्रीण शाहरुख खानची मुलगी सुहाना खान यांना नवीन कारमधून डिनर डेटला गेले होते. व्हिडीओमध्ये सुहाना खान आणि अगस्त्य खूपच खूश दिसत होते. 


योगेन शाहच्या पोस्टमध्ये काय?


अभिषेक बच्चनच्या या नवीन कारबाबत सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शाह याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, अभिषेकने आपल्या नवीन कारसाठी ऐश्वर्या रायचा आवडता क्रमांक घेतला आहे. त्यामुळे अभिषेकचा हा निर्णय ऐश्वर्यासाठी एक सरप्राईज असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. 



अभिषेक बच्चनची नवीन कार


अभिषेक बच्चनने काळ्या रंगाची नवीन कार खरेदी केली आहे. या कारची नंबर प्लेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. नवीन कारचा नंबर 5050 असा आहे. असं म्हटलं जात आहे की, हा क्रमांक ऐश्वर्या रायच्या आवडीचा आहे. या आधी देखील अभिषेक आणि ऐश्वर्याच्या पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज-बेंझ एस-क्लास चा नंबर देखील 5050 होता. मात्र, या कारची विक्री करण्यात आली आहे. 


मात्र, बच्चन कुटुंबियांकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. चाहत्यांनी देखील त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. अभिषेकने खरंच ऐश्वर्याचा आवडता नंबर घेतला आहे की नाही? असा प्रश्न देखील चाहते उपस्थित करत आहेत.