Stree 3: 'स्त्री 2' चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2024 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची तुफान चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. 'स्त्री 2' चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 2018 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच 'स्त्री 3' सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'स्त्री 3' या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. परंतु 'स्त्री 2' मधून सर्वात चर्चेत असणारे पात्र म्हणजे जना हे साकारणारा अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केलेला खुलासा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 


काय म्हणाला अभिषेक बॅनर्जी? 


एका मुलाखतीत अभिषेक बॅनर्जीने एक मोठा खुलासा केला आहे. त्याने 'स्त्री 3' चित्रपटासंदर्भात एक हिंट दिली आहे. जर 'स्त्री 3' चित्रपटामध्ये जनाने सुपरव्हिलन म्हणून काम केलं तर मला खूप आनंद होईल. त्याचबरोबर तिसऱ्या भागात अभिनेता अक्षय कुमारसोबत भूमिका साकारता आली तर खूप मज्जा येईल. असं अभिषेक बॅनर्जी म्हणाला आहे. 'वेदा' चित्रपटात अभिषेक बॅनर्जीने निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. 


'स्त्री 2' चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांनी 'स्त्री 3' या चित्रपटाची घोषणा केली आहे. लवकरच 'स्त्री 3' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं त्यांनी म्हटलं आहे. 'स्त्री 2' या चित्रपटात अक्षय कुमारने साकारलेली भूमिका ही सरकटाच्या नातेवाईकाची असून या चित्रपटाच्या शेवटी सरकटाचा विनाश केला जातो आणि तो लाव्हामध्ये खाली पडून जळून जातो. त्यावेळी तो लाव्हा पिऊन तो शक्ती प्राप्त करताना अक्षय कुमार शेवटी दिसत आहे. 



'स्त्री 2'ची कमाई


'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहे. या चित्रपटाने अनेक हिट चित्रपटाना मागे टाकले आहे. 'स्त्री 2' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 585 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने भारतामध्ये 500 कोटींचा आकडा गाठला आहे.