Ajay Devgan च्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; वाचा काय आहे नेमकं प्रकरण
दिग्दर्शक इंद्र कुमारचा आगामी चित्रपट `थँक गॉड` म्हणूनच अडचणीत सापडला आहे.
Ajay Devgan in Trouble: अभिनेता अजय देवगणनं आपल्या (Actor Ajay Devgan) अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. नुकताच त्याला तान्हाजी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या रेनवे 34 (Runway 34) या चित्रपटातील अभिनयासह त्याच्या दिग्दर्शनाचेही सर्वत्र कौतुक झाले आहे. (actor ajay devgan is in trouble a person files an case against film thank god for hurting religional sentiments in up)
परंतु सध्या अभिनेता अजय देवगण वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अजय देवगणचा थॅक्स गॉड (Ajay Devgan Film Thank God) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पण प्रदर्शनापुर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातून धार्मिक भावना दुखावल्या गेल्यानं उत्तरप्रदेशमध्ये एका व्यक्तीनं या चित्रपटाच्या कलाकारांवर केस दाखल केली आहे. (Case filed against movie Thank God)
दिग्दर्शक इंद्र कुमारचा आगामी चित्रपट 'थँक गॉड' म्हणूनच अडचणीत सापडला आहे. दिग्दर्शक इंद्र कुमार, अभिनेता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याविरुद्ध वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी जौनपूर न्यायालयात खटला दाखल केला असल्याची बातमी समोर आली आहे.
याचिकाकर्त्याचे म्हणणे 18 नोव्हेंबरला नोंदवले जाणार आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धर्माची खिल्ली उडवली आहे आणि धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
आपल्या याचिकेत श्रीवास्तव म्हणाले की, अजय देवगण हा सूट घालून भगवान चित्रगुप्ता यांची भूमिका करताना दिसतो आहे आणि एका दृश्यात तो विनोद आणि आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसला आहे. "चित्रगुप्त हे कर्माचे स्वामी मानले जातात आणि ते माणसाच्या चांगल्या-वाईट कृत्यांची नोंद ठेवतात. देवांचे असे चित्रण केल्याने धार्मिक भावना दुखावल्या असून यामुळे वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते," असे याचिकेत म्हटले आहे.
'थँक गॉड' (Thank God Movie release) हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.