मुंबई : अभिनेता आणि बिग बॉस कंटेस्टेंट एजाज खानला पोलिसांनी अटक केलं आहे. एजाज खानवर ड्रग्स घेण्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसेच एजाजकडे नशेच्या 8 गोळ्या देखील सापडल्या आहेत. नवी मुंबईचे पोलिस आता एजाजकडे चौकशी करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा पोलिसांनी एजाजला पकडलं तेव्हा तो अगदी नशेत धुंद होता आणि जमिनीवर पडलेला होता. तसेच पोलिसांनी एजाजचे दोन फोन देखील जप्त केले आहेत. आता पहिल्यांदाच नाही तर या अगोदर देखील एजाजला पोलिसांनी अटक केली आहे. या अगोदर एजाजला 2017 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर ड्रग्स सप्लाय केल्याचा देखील आरोप आहे. 


तसेच एजाजवर महिला हेअरस्टायलिस्टला न्यूड आणि वल्गर फोटो पाठवण्याचा देखील आरोप आहे. एजाज रक्त चरित्र, नायक आणि या रब या सिनेमात दिसला आहे. एजाज कॉमेडी नाइट विथ कपिल, करम अपना अपना, कहानी हमारे महाभारत आणि रहे तेरा आशिर्वाद सारख्या टीव्ही सिरियलमध्ये महत्वाचा रोल साकारला होता.