Ajinkya Deo Maherchi Sadi : मराठी चित्रपटांबद्दल बोलताना 'माहेरची साडी' या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला जातो. 1991 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी तब्बल 12 कोटींची कमाई केली होती. 'माहेरची साडी'ची चर्चा आजही पाहायला मिळते. अगदी आजही अनेकदा चित्रपटांसाठीच्या वहिन्यांवर दिसणार चित्रपट ते मिम्सपर्यंत 'माहेरची साडी'ची क्रेझ कायम असल्याचं दिसतं. मात्र हा चित्रपट एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरेल आणि इतिहास रचेल याची खात्री चित्रपटामध्ये काम करणारे अभिनेते अजिंक्य देव यांनाही नव्हती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अजिंक्य देव यांनी हा चित्रपट स्वीकारताना काय घडलेलं. चित्रपटाबद्दल आधी काय मत होतं आणि नंतर काय घडलं याबद्दल सविस्तरपणे भाष्य केलं आहे.


पावणेदोन तास कथा वाचन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माहेरची साडी' या चित्रपटाचा मोठा चाहता वर्ग आहे. याच चित्रपटामध्ये अभिनेत्री अलका कुबल यांनी साकारलेली बहीणीची भूमिका आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आहे. या चित्रपटाचा अलका कुबल यांच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य देव यांनी चित्रपट स्वीकारताना काय घडलेलं याबद्दलची माहिती दिली आहे. माहेरची साडी या चित्रपटासाठी आपल्याला विजय कोंडकेंनी विचारलं होतं असं अजिंक्य देव म्हणाले. तब्बल पावणेदोन तास अजिंक्य यांना विजय कोंकडेंनी चित्रपटाची कथा ऐकवली. 'या चित्रपटामध्ये कुठे टाळ्या मिळतील. महिला कुठे रडतील या सर्व गोष्टींची कल्पना विजय यांना त्यावेळीच (कथा सांगतानाच) होती,' असं अजिंक्य देव म्हणाले.


महाराष्ट्राची जाण नाही हे समजलं


"मी 'माहेरची साडी' चित्रपटाच्या ट्रायलच्या वेळेस, माझ्या नावावर आणखी एक फ्लॉप पडणार असं म्हटलं होतं. पण त्याच दिवशी आपल्याला महाराष्ट्राची जाण नाही हे मला जाणवलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला. गावांमधून महिला ट्रक भरुन भरुन हा चित्रपट पाहायला येत होतं. हा चित्रपट एवढा सुपरहिट होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं," असं अजिंक्य देव यांनी सांगितलं. 


नक्की वाचा >> 'महाराष्ट्राला आज बाळासाहेबांची खरी...'; अभिनेता अजिंक्य देव भावूक


आई-बाबांचे मतभेद


आपण मनोरंजन सृष्टीमध्ये यावं की नाही यावरुन वडील रमेश देव आणि आई सीमा देव यांच्यात मदभेद होते असंही अजिंक्य यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. "मी इंडस्ट्रीमध्ये यावं अशी आईची फार इच्छा नव्हती. इंडस्ट्रीमधील माझ्या पदार्पणावरुन आई-बाबांचे वाद जाले असणार. मात्र मला मनोरंजन सृष्टीची गोडी निर्माण झाली. 'सर्जा'च्या शुटींगआधीच बाबांनी मला मनोरंजन आणि अभिनय क्षेत्राबद्दलची माहिती दिली होती. मी या क्षेत्रात नाव कमवावं अशी बाबांची फार इच्छा होती," असं अजिंक्य देव यांनी नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत म्हटलं.