मुंबई : 'विश्वासम वेदालम' आणि 'वीरम' असे अनेक सुपरहिट सिनेमा देणारा अभिनेता अजित कुमार याची चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ आहे. तमिळ सुपरस्टार अजित कुमार 'थाला' या नावाने ओळखला जातो. थालाचं फॅनफॉलोविंग देखील खूप मोठं आहे. त्याचे चाहते कायमच त्याच्यासाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्याचं प्रेम व्यक्त करत असतात, मात्र यावेळी एका चाहत्याने अजितला मोठा धक्का दिला आहे. अजितच्या एका चाहत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या का केली याचं कारण आद्यापही अस्पष्ट आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजितच्या फॅनक्लबने या संदर्भातील ट्विट करत माहीती दिली असून त्याच्या कुटुंबाला मदत करा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा असं आवाहन देखील त्याच्या चाहत्यांनी केलं. आत्महत्या केलेल्या चाहत्याच्या शरीरावर अजितचे नाव, त्याच्या चित्रपटातील डॉयलॉगचे टॅट्यू काढल्याचे दिसत आहे.



'एन वीजु एन कानावर' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये थालानं पदार्पण केले. गायक एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी अजित कुमारला तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये ब्रेक दिला. 'वेदालम', 'आरमबम', 'वीरम', 'येन्नई अरिंधाल' आणि 'विवेगम' हे चित्रपट हिट झाले.त्याने आजपर्यंत ५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.अजितच्या चाहत्याच्या आत्महत्येनंतर अजितला दुख:द धक्का बसला आहे.