Shahrukh Khan: शाहरूख खान (Shahrukh Khan) या अभिनेत्यासोबत सर्वच अभिनेते आणि अभिनेत्री काम करण्यासाठी उत्सुक असतात परंतु बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये काम केलेला हा अभिनेता मात्र शाहरूख खानसोबत काम करण्यास तितकासा उत्साही नाही. (actor ali zafar says it is better if shah rukh khan dont collaborate with me right now see why goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आणि गायक अली जफरने आलिया भट्टच्या 'डियर जिंदगी' (Dear Zindagi) चित्रपटातून काम केले होते. त्यानंतर हा अभिनेता बॉलीवूडमध्ये फारसा दिसला नाही. परंतु आता अचानकच या अभिनेत्याने शाहरूखसोबत काम करण्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.  'डियर जिंदगी' या चित्रपटात शाहरूख खानही होता. 


शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा नाही? अली जफर आणि शाहरुख खान या दोघांनी 'डियर जिंदगी' चित्रपटात काम केले होते. यात दोघांचे एकत्र सीन नव्हते. आता एका मुलाखतीत अलीला शाहरुखसोबत काम करण्याबाबत विचारण्यात आले. यावर तो म्हणाला की, शाहरुख खानने आता त्याच्यासोबत काम केले नाही तर बरे होईल. त्याने हे असे का केले याबाबत त्याने स्पष्टीकरण दिले नाही. 


अली जफरला सध्या शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा नाही, पण त्याला शहनाज गिलसोबत नक्कीच काम करायचे आहे. अली याच मुलाखतीत म्हणाला, 'शहनाजसोबत मला माझ्या एका गाण्यात काम करायला नक्कीच आवडेल.' 


अली जफरने 2010 मध्ये बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. 'तेरे बिन लादेन' हा त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. त्यांनी एकूण 9 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. अली जफर शेवटचा 'डियर जिंदगी'मध्ये दिसला होता.