Allu Arjun Got Emotional During Police Questioning: संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात साउथ अभिनेता अल्लू अर्जुनची तेलंगणा पोलिसांनी मंगळवारी सुमारे 4 तास चौकशी केली. अभिनेता त्याचे वडील अल्लू अरविंद आणि वकिलांसह 11 वाजण्याच्या सुमारास चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात पोहोचले. दुपारी 2.45 वाजता ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. सुमारे चार तास चाललेल्या चौकशीमध्ये पोलिसांनी अभिनेत्याला काही प्रश्न विचारले. ज्यामध्ये अल्लू अर्जुनला पोलिसांनी चित्रपटाच्या प्रीमियरसाठी परवानगी दिली होती का? असे अनेक प्रश्न पोलिसांनी अभिनेत्याला विचारले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीसीपी अक्षांश यादव यांच्यासह पोलिसांच्या पथकाने अल्लू अर्जनची चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक सुरक्षेबद्दलही विचारण्यात आले आणि बाऊन्सर्सनी त्याच्या चाहत्यांना कथितपणे धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी सांगितले की, अभिनेत्याने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आणि गरज पडल्यास ते त्यांना पुन्हा कॉल करतील.


चेंगराचेंगरीचा व्हिडीओ पाहून अभिनेता भावूक 


गुलटे यांच्या म्हणण्यानुसार, चौकशीच्या वेळी अल्लू अर्जुन भावूक झाला. 'पुष्पा 2' अभिनेत्याची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली आणि संध्या थिएटरमधील 'पुष्पा 2' विशेष कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीचे व्हिडिओ अभिनेत्याला दाखवण्यात आले. व्हिडिओ पाहताना, श्रीतेज आणि रेवती जखमी झाल्याचे दृश्य पाहून अल्लू अर्जुन भावूक झाला.



थिएटरमध्ये नेमकं काय घडलं? 
 
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता. ज्याला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अटक केली. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याच दिवशी अभिनेत्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. 14 डिसेंबरला सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली.