मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'पुष्पा' सध्या दमदार कामगिरी करताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ते अगदी त्यातील प्रत्येक गाणं प्रदर्शित होईपर्यंत प्रत्येक वेळी दणक्यात चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'Spider-Man: No Way Home' या हॉलिवूडपटाची टक्कर असतानाही 'पुष्पा' लाच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्या क्षणापासून के आतापर्यंत कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. 


पहिल्याच दिवशी चित्रपटानं 24.9 कोटी रुपयांची कमाई केली. पुढे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सर्वांनीच पाहिले. या चित्रपटानं आता 100 कोटींच्या कमाईचा आकडाही ओलांडला आहे. 


जागतिक स्तरावर चित्रपटाला मिळणारी लोकप्रियता पाहता हे आकडे खूप काही सांगून जात आहेत. 


तिथं अमेरिकेमध्येही पुष्पाचा बोलबाला पाहाला मिळत आहे. 



सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा'मध्ये रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांच्याव्यतिरिक्त फहाज फासील, धनंजय, सुनील, अजय घोष, राव रमेस, अनसुया भारद्वाज, शत्रू, अजय, श्रीतेज आणि इतर कलाकार झळकले आहेत. 


अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिसुद्धा या चित्रपटामध्ये झळकत आहे. एका आयटम साँगमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.