Amir Khan Daughter: आमिर खानची लेक गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहे. त्यातून तिच्या लव्ह अफेअरमुळे तिची सोशल मीडियावर रोज कुठल्या ना कुठल्या विषयावरून चर्चा होतंच असते. आपल्या बॉयफ्रेंडसोबत इन्टाग्रामवर वेकेशनपासून डेटिंगपर्यंतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ ती इन्टाग्रामवर शेअर करत असते. (actor amir khan daughter ira khan boyfriend nupur shikhare is a fitness trainer who trains bollywood celebs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली दोन-तीन वर्ष ती फिटनेस फ्रिक नुपूर शिखरेला (Nupur Shikhare) डेट करते आहे. आता या दोघांचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सगळीकडेच त्यांच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. नुपूर शिखरे आणि आयरा खान (Nupur Shikhare and Ira Khan) यांच्या डेटिंगची चर्चा कायमच सुरू असते. आता नुपूरनं आयराला केलेलं प्रपोज (Ira Khan Purpose) पाहून सगळीकडेच त्याचीच चर्चा आहे.


आणखी वाचा - घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात? या खास व्यक्तीने दिली हिंट


अगदी फिल्मी पद्धतीनं आयराच्या बॉयफ्रेंडनं तिला प्रपोज केलं, तिच्यासमोर गुडघे टेकून तिला रिंग त्यानं प्रेझेंट केली जी तिनं स्विकारली. दोघांनी एकमेकांनी कीस केलं. 


आणखी वाचा - 'आमच्या घरात...' Shweta Tiwari नं सांगितला 'तो' थरारक अनुभव


परंतु आयराला डेट करणारा हा नुपूर शिखरे आहे तरी कोण? तो नक्की काय काम करतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. नुपूर शिखरे हा एक डान्सर आहे. त्यानं अनेक सेलिब्रेटींना डान्सिंगसाठी ट्रेन केलं आहे. सोशल मीडियावर तो आपले डान्सिंग व्हिडीओही शेअर करत असतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


डान्सरसोबतच तो एक फिटनेस ट्रेनरही आहे. त्यानं आयरा खानलाही त्याबाबतीत ट्रेन केलं आहे. 2020 पासून आयरा आणि नुपूर एकत्र आहेत. आयरा खान तसेच अनेक सेलिब्रेटींसोबत त्यानं आपले फिटनेस ट्रेनिंग क्लासेस घेतले आहेत. सुष्मिता सेनलाही (Sushmita Sen) त्यानं अनेक वर्षे ट्रेन केलं आहे. 


नुपूर शिखरे हा मराठी मुलगा आहे. तो त्याच्या आईसोबत राहतो. गेली दोन वर्षे आयरा आणि नुपूर एकत्र आहेत. त्या दोघांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.