मुंबई : अभिनेता अमित पुरोहितचं निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित पुरोहितच्या निधनाने बॉलिवूडसह, दाक्षिणात्य कलाविश्वातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमित पुरोहितने २०१८ मध्ये अभिनेत्री अदितीराव हैदरीसोबत सुपटहिट 'समोहनम' या तेलुगू चित्रपटातून भूमिका साकारली होती. 'समोहनम' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सुधीर बाबू आणि आदिती राव हैदरी यांनी सोशल मीडियावर अमितच्या निधनाबाबत पोस्ट भावनिक पोस्ट करत त्याच्या निधनाची माहिती दिली आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमितच्या निधनाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. 


अमित पुरोहित, अदिती राव हैदरीसोबत असलेल्या नात्यामुळेही चर्चेत होता. अमितने 'पंख' आणि 'आलाप' यांसारख्या हिंदी चित्रपटातूनही भूमिका साकारल्या आहेत.