मुंबईः बॉलिवूडस्टार अमिताभ बच्चन त्यांच्या जबरदस्त अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांचं प्रसिद्ध अभिनेत्री रेखासोबत अफेअर होतं. बिग बी आणि रेखा यांच्या अफेअरशी संबंधित अनेक किस्से आजही ऐकले जातात.



रिपोर्ट्सनुसार, अमिताभ आणि रेखाच्या कथित अफेअरची बातमी जया बच्चन यांच्यापर्यंतही पोहोचली होती. यानंतर जया बच्चन यांनी काय केले हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 


एकदा अमिताभ एका शूटिंगच्या निमित्ताने शहराबाहेर गेले होते. त्यावेळी योग्य संधी पाहून जयाने रेखाला तिच्या घरी जेवणासाठी बोलावलं. जयाच्या बाजूने आलेले निमंत्रण पाहून रेखालाही धक्का बसला. अभिनेत्रीला वाटले की जया नक्कीच तिला तिच्या घरी बोलावेल आणि जाब विचारेल. रेखा घाबरतच जयाच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांना धक्का बसला.



जया रेखाशी इतक्या प्रेमाने बोलल्या की जणू काही झालंच नाही. रेखा आणि जया यांनी एकत्र डिनरही केले आणि यादरम्यान दोघांमध्ये खूप चर्चा झाली. मात्र, काही वेळातच कथेत ट्विस्ट आला.


जया जेवणानंतर रेखाला बाहेर सोडण्यासाठी आल्या आणि असं काही बोलल्या की जे रेखालाही अपेक्षित नव्हते. जया रेखाला म्हणाली, 'काहीही झाले तरी मी अमितला सोडणार नाही'.


यानंतर रेखा यांना समजलं की आता अमिताभ यांच्यापासून वेगळं होण्याची वेळ आली आहे आणि या घटनेनंतरच दोघांचं ब्रेकअप झालं