मुंबई : 'स्टुडंट ऑफ द ईयर-2' या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या पांडेने आज 'वर्ल्ड सोशल मीडिया दिवसाच्या निमित्ताने 'सो पॉजिटिव' या नावाची एक मोहीम सुरू केली आहे. अनन्या पांडे ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनन्या नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अनन्याने आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ द्वारे अनन्या सोशल मीडियावर होणाऱ्या दादागिरीच्या विरोधात लोकांना जागरूक करताना दिसत आहे. व्हिडिओत अनन्या लोकांना सकारात्मक सल्लाही देताना दिसत आहे. या मोहीमचा उद्देश लोकांना जागरुक करणे हाच आहे. अनन्याच्या 'सो पॉजिटिव' या मोहिमेला अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीकडूनही तिचे कौतुक होत आहे.


अनन्या पांडे लवकरच अभिनेता कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्या बरोबर 'पति पत्नी और वो' या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.