प्रयोगाच्या वेळी असं काय घडलं की डॉ. अमोल कोल्हे यांनी धरले चिमुरड्याचे पाय, पाहा Video
Dr. Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सध्या त्यांच्या एका व्हिडीओनं (Amol Kolhe Video With a Boy) चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, अमोल कोल्हे हे चक्क एका लहान मुलांच्या पाया पडताना दिसत आहेत. परंतु नक्की असं काय घडलं आणि अमोल कोल्हे चक्क त्याच्या पाया पडले?
Dr. Amol Kolhe Video: रूपेरी तसेच छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भुमिका अजरामर करणारे अभिनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या त्यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याच्या प्रयोगात व्यस्त आहेत. अख्ख्या महाराष्ट्राचे हे लाडके नाटक नाही. फक्त महाराष्ट्रच नाहीतर तर देशभर आणि जगभरातील प्रेक्षकांनी या नाटकाला तूफान प्रतिसाद दिला आहे. सध्या या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग सुरू आहेत. असाच एक प्रयोग कराड येथे घेण्यात आला होता. त्यावेळी मंचावर प्रवेश घेताना घोड्याचा पाय दुमडला (Amol Kolhe Injured) आणि अमोल कोल्हे यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली परंतु त्यांनी प्रयोग रद्द केला नाही तर तो सुरू ठेवला आणि जिद्दीनं पुर्ण केला. (actor and politician amol kholhe touches feet of a little by at shivputra sambhaji natak video goes viral)
सोशल मीडियावर व्हि़डीओ व्हायरल
या अपघातानंतर त्यांनी इन्टाग्रामवरूनही आपली हेल्थ अपडेट दिली होती. 'नथिंग टू वरी' (Amol Kolhe Post after Injury) म्हणत परत एकदा नाटकाच्या प्रयोगाचा शुभारंभ करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. सोशल मीडियावर डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe Instagram) हे कायमच सक्रिय असतात. आपल्या कामाबद्दल आणि खाजगी आयुष्याबद्दलही अनेक अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते एका चिमुरड्याच्या पाया पडताना दिसत आहेत. यावेळी या चिमुरड्याला पाहताच त्यांनी त्या चिमुकल्याचे पाय धरले आणि त्याच्या पायाला पडले. सध्या हा व्हिडीओ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे. या व्हिडीओमध्ये असं काय झालं की (Amol Kolhe Video) अमोल कोल्हे त्याच्या पाया पडले?
हेही वाचा - दगंल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्राची स्वप्नपूर्ती, चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज!
त्या लहान मुलाला पाहून अमोल कोल्हे यांनी केलं असं काही की...
अमोल कोल्हे यांच्या अपघातापुर्वी 6 एप्रिलला 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाच्या एका प्रयोगाला हा व्हिडीओ काढला असल्याचे कळते आहेत. हा प्रयोग कोल्हापूरला होता. या प्रयोगाला काही प्रेक्षकांनी आपल्या लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात घेऊन आले होते. असा एका लहानगा मुलगा तेथे आला होता. त्याला पाहून अमोल कोल्हे आले आणि त्यांनी वाकून त्याला मुजरा केला आणि त्याच्या पाया पडले. हे पाहून उपस्थित मंडळी भारावून गेली. या आलेल्या मुलांना डॉ. अमोल कोल्हे यांनी 'शिवपुत्र संभाजी' रूपातील चित्र रेखाटून भेट केले.
प्रयोग पुन्हा जोमानं सुरू
'शिवपुत्र संभाजी' या नाटकाचे प्रयोग सध्या जोरात सुरू आहेत. 11 ते 16 मे रोजी या नाटकाचे प्रयोग होणार असल्याची माहिती डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.