मुंबई : स्टार प्रवाहवर ९ मार्चपासून सुरू होत आहे धमाकेदार डान्स रिअ‍ॅलिटी शो 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'. या आधीच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. त्यामुळे नव्या पर्वाची उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करणार आहेत. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहाता येणार आहे. त्यामुळे या पर्वात मंचावर नृत्यासोबतच नात्यांमधली गंमतही अनुभवता येईल. तर नेहमी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अंकूश चौधरीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे सुपरस्टार अंकुश चौधरी. तर लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. मराठी सिनेमांमध्ये आपल्या जबरदस्त नृत्यदिग्दर्शनाने वेगळी ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रिऍलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत.


या ग्रॅण्ड रिअ‍ॅलिटी शोविषयी सांगताना सुपरजज अंकुश चौधरी म्हणाले, 'मी होणार सुपरस्टारचं प्रत्येक पर्व हे वेगळेपण घेऊन येतं. यावेळेच्या पर्वात जोड्यांची धमाल अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे फक्त नृत्यच नाही तर या मंचावर नात्यांचाही खऱ्या अर्थाने सोहळा होईल. पहिल्या दोन्ही पर्वांना भरभरुन प्रेम मिळालं. दोन्ही पर्वातल्या स्पर्धकांच्या मी अजूनही संपर्कात आहे. त्यामुळे या मंचाने मला नवा परिवार दिलाय असं म्हणू शकतो. या पर्वातही नवनव्या स्पर्धकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे' तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन ९ मार्च पासून दर शनिवार रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार' (Mi Honar Superstar) हा कार्यक्रम काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.‘मी होणार सुपरस्टार'च्या या आधीच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.   या कार्यक्रमाचे विविध पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व अर्थात ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ हा धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हे पर्व विशेष असणार आहे कारण यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करणार आहेत. यावेळी या पर्वात आपल्याला आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहाता येणार आहे. त्यामुळे या नव्या पर्वासाठी चाहते कमालीचे उत्सुक असल्याचं पहायला मिळत आहेत.