Apurva Agnihotri Shilpa Saklani Blessed With A Baby Girl After 18 Years : छोट्या पडद्यावरील 'जस्सी जैसी कोई नहीं' ही मालिका सगळ्यांच्या मनात छाप सोडून गेली आहे. 'जस्सी जैसी कोई नहीं' फेम अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा सकलानी यांच्या आयुष्यात एका राजकुमारीचं आगमन झालं आहे. अपूर्व आणि शिल्पाला लग्नाच्या 18 वर्षानंतर पालक होण्याचं सुख मिळालं आहे. शिल्पानं नुकतंच एका मुलीला जन्म दिला आहे. त्यांचा मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपूर्व आणि शिल्पा हे  2004 साली विवाहबंधनात अडकले होते. दरम्यान, आता 18 वर्षांनंतर 2 डिसेंबर रोजी या जोडीच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली आहे. यावेळी अपूर्वनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी अपूर्वनं शिल्पा आणि त्याच्या लेकीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अपूर्व म्हणाला, माझा हा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास वाढदिवस ठरला आहे कारण देवानं आम्हाला सर्वात खास, अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक भेट दिली आहे. शिल्पा आणि मी आमची लाडकी लेक ईशानी कानू अग्निहोत्रीची ओळख करून देत आहोत. मुलीवर प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करा. ओम नमः शिवाय.', असे कॅप्शन दिले आहे. 


हेही वाचा : Alia Bhatt च्या मुलीसाठी आली 'ही' भेटवस्तू; फोटो पोस्ट करत म्हणाली...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, अपूर्व 50 वर्षांचा आहे, तर शिल्पा 40 वर्षांची आहे. अपूर्व आणि शिल्पाची पहिली भेट ही त्यांच्या एका कॉमन फ्रेंडमुळे भेटले. त्यानंतर ते सतत भेटू लागले. जेव्हा शिल्पानं अपूर्वला पहिल्यांदा परदेशात पाहिलं तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली होती. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 24 जून 2004 रोजी दोघांनी डेहराडूनमध्ये लग्न केले. अपूर्व हा रिअॅलिटी शो 'बिग बॉस' मध्ये दिसला होता. याशिवाय 'नच बलिए सीझन 1' मध्ये ते दिसले होते.