मुंबई : दोन वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने मलायका अरोरासोबत असलेले नाते संपवले. २० वर्षांच्या नात्याला घटस्फोटाने पूर्णविराम लागला. आता सध्या तो एका मॉडलला डेट करतोय. तिचे नाव येलो मेहरा. अरबाजसोबत डिनर डेट, पार्टीजमध्ये तिला स्पॉट करण्यात आले आहे.


कोण आहे येलो मेहरा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच येलोचे काही बिकीनी फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. येलोने हे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले होते. येलो एक मॉडल आणि शेफ आहे. त्याचबरोबर ती फॅशन डिजाईनिंगही करते.



त्यांचे फोटोज सोशल मीडियावर


काही दिवसांपूर्वी येलो अरबाजसोबत गोव्यात एन्जॉय करताना दिसली. त्यावेळेसचे काही फोटोज आणि व्हिडिओज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचवेळेस कोणाला तरी डेट करत असल्याचा खुलासा अरबाजने केला होता. मात्र त्याने नाव जाहीर केले नव्हते. 


ती आहे एका मुलाची आई


४२ वर्षांची येलोचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगा देखील आहे. पूर्वी तिने रेस्टोरन्ट मालिक मानिक कॉन्ट्रेक्टरसोबत विवाह केला होता. मात्र काही कारणास्वत त्यांचे नाते टिकू शकले नाही. त्यानंतर तिने अजून एका रेस्टोरन्ट मालक आकाश मिश्रा याच्याशी लग्न केले. कालांतराने दोघे विभक्त झाले. आता ती तिचा मुलगा काई सोबत राहते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येलोला अरबाजच्या घरी गॅलक्सी अपार्टमेंटमध्येही अनेकदा पाहण्यात आले आहे.