मुंबई : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने चाहत्यांच्या आधिराज्य गाजवलं आहे. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद धनू यांचं निधन झालं आहे. ते 47 वर्षांचे होते.  अरविंद धनू यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद धनू यांनी आतापर्यंत मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता त्यांच्या निधनाने कलाविश्वात आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद धनू सोमवारी एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 



पण प्रकृती खालावल्यामुळे उपचारा दरम्यान अरविंद धनू यांचं निधन झालं. त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. 


मराठी कलाविश्वातील अरविंद धनू यांच्या कामगिरीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘लेक माझी लाडकी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली. ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे.