मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आयुष्मान खुरानाचे अनेक चित्रपट असे केले आहेत ज्यातून समाजाल एक मेसेज देता येईल. त्यात अनेक चित्रपट आहेत. नुकताच अभिनेत्याचा 'ड्रिम गर्ल २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवुड अभिनेता आयुष्मान खुराना ह्याने ड्रीम गर्ल २ द्वारे आपल्या करियरची सर्वात बेस्ट ओपनिंग घेतली असून , तीन दिवसांत तब्बल ४०.७१ करोड़ ची भरघोस कमाई केली  आहे. आयुष्मान त्याच्या आयुष्यातील या खास क्षणी त्याचे वडील पी. खुराना ह्यांना मिस करत असून आणि त्याच्या वडिलांनी  ड्रीम गर्ल 2 पहावी अशी इच्छा आहे!


आयुष्मान ड्रीम गर्ल 2 च्या यशोगाथेबद्दल बोलण्यासाठी संपर्क साधला असता, अभिनेता म्हणाला, ''माझ्या वडिलांनी हे अनुभवायला हवं होतं. ड्रीम गर्ल हा त्यांचा आवडता चित्रपट होता. मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कसा केला याचा त्यांना खूप अभिमान होता. मला आठवतंय तो चित्रपट पाहताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. हा चित्रपट धडाकेबाज यश मिळवेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. माझी इच्छा आहे की त्यांनी ड्रीम गर्ल 2 देखील बघायला हवा होता.


आयुष्यमान  पुढे म्हणाला, ''मला माहित आहे की, त्यांना हा सिनेमा आवडला असता आणि त्यांना पुन्हा मनापासून हसताना पहायला मला आवडलं असतं ते माझे सर्वात मोठे समर्थक होते. त्यांचा माझ्यावरील अतुलनीय विश्वासाने माला आज मी जो आहे असं बनवलं आहे.''


आयुष्मान म्हणतो की त्याचे वडील त्याचे सर्वात मोठे चीअर-लीडर होते आणि त्यांनी त्याला असा मनुष्य बनण्यास प्रवृत्त केलं आणि तो आज आहे. तो पुढे म्हणतो, ''मी कमी प्रवास केलेल्या मार्गावर गेलो कारण त्यांनी मला सांगितलं की, मी माझ्या नशिबाचा निर्माता आहे आणि मी नेहमी माझं मन जे सांगतं ते केले पाहिजे. मला माहीत आहे की ते मला वरून आशीर्वाद देत असतील. त्यांचे प्रगल्भ शब्द माझ्या मनात नेहमी गुंजत राहतील 'बेटा पब्लिक की नब्ज समझो'.