नवी दिल्ली : आसामी अभिनेत्री आणि गायिका बिदिशा बजबरुआ हिनं सोमवारी गुरुग्राम स्थित आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियाच्या माहितीनुसार, बिदिशानं गुरुग्रामच्या सुशांत लोक स्थित आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. बिदिशा मूळची गुवाहाटीच्या उजान बाजारची रहिवासी होती. 


आसामच्या एका स्थानिक वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, बिदिशाच्या आत्महत्येमागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.


परंतु, बिदिशाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलंय. बिदिशाच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.


बिदिशानं २०१६ मध्ये गुजरातच्या निशीथ जैन याच्याशी विवाह केला होता. पोलिसांनी बिदिशाच्या पतीविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केलीय. बिदिशाचे कुटुंबीय गुरुग्रामकडे रवाना झालेत.