मुलगा बॉबी देओलबाबत धर्मेंद्र यांचं सगळ्यांसमोर धक्कादायक वक्तव्य
धर्मेंद्र यांनी बॉबीबद्दल एक असा किस्सा सांगितला की, सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
मुंबई : सलमान खानच्या बिग बॉसमध्ये जेव्हा धर्मेंद्र पहिल्यांदा पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से सांगितले. यादरम्यान त्यांनी बॉबीबद्दल एक असा किस्सा सांगितला की, सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, एका चित्रपटात बॉबी देओलने माझ्या बालपणीची भूमिका साकारली होती. धर्मेंद्र यांनी सांगितलं की, 1977 साली आलेला 'धरमवीर' या चित्रपटामध्ये बॉबीने त्याच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. चित्रपटात बॉबी देओलला परिधान करण्यासाठी एक ड्रेस शिवण्यात आला होता.
जो त्याच्या ड्रेसशी मॅच होता, मात्र बॉबी देओल अंडरवेअर न घालताच सेटवर आला. बॉबी सेटवर पोहोचला तेव्हा त्याला पाहून सगळे हसले. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात धर्मेंद्र लवकरच चित्रपटात दिसणार आहे.
धर्मेंद्र यांनी यावेळी बॉबीबाबत आपल्या मनातली इच्छा देखील व्यक्त केली. शोलेच्या सिक्वेलमध्ये बॉबी दिसावा, अशी धर्मेंद्र यांची इच्छा आहे. धर्मेंद्रही चित्रपटाच्या कथेचा विचार करत आहेत. धर्मेंद्र यांच्या उपस्थितीने बिग बॉसची संध्याकाळ खूपच रंगतदार झाली तसंच धर्मेंद्र आणि सलमानच्या जोडीने मजा द्विगुणित केली. धर्मेंद्र यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, या वयातही त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. ते 'अपने 2' आणि रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेतही दिसणार आहे.