Actor Darshan Thugudeepa : कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याची मैत्रिण पवित्रा गौडाला 11 जून रोजी हत्ये प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांना बेंगळुरु पोलिसांनी अटक केली. ते दोघेही आता 17 जून पर्यंत पोलिसांच्या कस्टडीत आहे. दर्शनच्या अटकेनंतर ट्रोल्सर्सनं दर्शनच्या कुटुंबाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याच्या मुलावर निशाणा साधला. इतकंच नाही तर त्यांनी त्याच्यावर खूप वाईट कमेंट केल्या. इतकंच नाही तर त्यांनी दर्शनला कमेंट सेक्शनमध्ये शिवीगाळ देखील केला. यावर आता दर्शनच्या मुलानं रिअॅक्ट केलं आहे. दर्शनचा मुलगा विनीश खुगूदीपानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनीश थुगूदीपानं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या कुटुंबाला सहन कराव्या लागलेल्या अनेक गोष्टींविषयी सांगितलं आहे. विनीशनं यात लिहिलं की 'माझ्या वडिलांविषयी तुम्ही जे काही वाईट कमेंट केल्या आणि त्याशिवाय आक्षेपार्ह भाषेचा वापर केला, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभर. मी एक 15 वर्षांचा मुलगा आहे आणि मला देखील भावना आहेत हे तुम्ही समजून घेतलं नाही यासाठी धन्यवाद. या कठीण काळा दरम्यान, जेव्हा माझ्या आई आणि वडिलांना पाठिंब्याची गरज आहे तेव्हा मला काही बोलून काही फरक पडणार नाही.' 



नेमकं काय आहे प्रकरण?


दर्शनवर बंगळुरुच्या रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीची हत्येचा आरोप आहे. 9 जून रोजी रेणुकास्वामीचं पार्थिव हे एका नाल्यात सापडलं. तर 11 जून रोजी दर्शन आणि पवित्रा गौडाला अटक करण्यात आलं. या प्रकरणात आता दोन्ही कलकारांसोबत आणखी 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदन रिपोर्टनुसार, रेणुकास्वामीचं निधन जास्त प्रमाणात रक्तस्त्राव आणि शॉकमुळे झालं आहे. त्याच्या शरीरावर 15 जखमांच्या खुणा मिळाल्या, रेणुकास्वामीनं कथितपणे पवित्रा गौडाला अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले होते, ज्यानंतर दर्शननं त्याला चित्रदुर्ग ते बंगळुरु बोलावलं


अपहरण आणि मग हत्या


असं म्हटलं जातं की रेणुकास्वामी बंगळुरु पोहोचल्या, तर त्याचा कथितपणे अपहरण करुन त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर पार्थीवाला जवळच्या नाल्यात फेकण्यात आले. याविषयी तेव्हा कळलं जेव्हा श्वान हे पार्थिवाला कुरतडत होते.