Debina Bonnerjee : देबिनाला तिच्या दोन चिमुरड्यापासून राहवं लागतं लांब, नेमकं तिच्यासोबत काय घडलं?
Debina Bonnerjee : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत गेले होते. श्रीलंकेहून परतल्यानंतर असं काय घडलं की अभिनेत्रीला दोन चिमुरड्यापासून लांब राहवं लागतं आहे...
Debina Bonnerjee : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee ) नुकतीच श्रीलंकेहून परतली होती. पती गुरमीत आणि दोन लेकींसोबत ती तिथे फिरायला गेली होती. मात्र तिथून परतल्यानंतर देबिना बॅनर्जीबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आली. तिला इन्फ्लुएंझा बी या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे तिला तिच्या मुलींपासून आणि इतर कुटुंबीयांपासून दूर राहावं लागतंय. डेबिनाचा पती गुरमीत आणि दिविशा-लियाना (Divisha-liana) या दोन्ही मुली सुरक्षित आहेत. फक्त डेबिनालाच इन्फ्लुएंझा बी व्हायरसची (Influenza B Virus) लागण झाली आहे.
देबिना नुकतीच कुटुंबासह श्रीलंकेला गेली होती. तेथून परतल्यानंतर काही दिवसांनंतर तिची प्रकृती बिघडली. देबिनाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले, त्यामध्ये म्हटले की, 'देबिनाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ती सध्या खूप काळजी घेत आहे आणि जेवणाचीही काळजी घेत आहे. ती तिच्या मुलांपासून दूर राहून त्यांची काळजी घेत आहे आणि लवकरच बरी होऊन पुन्हा परत येईल. देबिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवरही याबाबत माहिती दिली आहे. देबिना आपल्या मुलींपासून दूर राहते कारण तिला ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आली आहेत.
वाचा: सबसे कातील Gautami Patil... एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क!
डेबिना आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) यांनी 15 फेब्रुवारी 2011 रोजी लग्न झाले. लग्नाच्या 11 वर्षांनंतर डेबिना पहिल्यांदा गरोदर झाली. 3 एप्रिल 2022 रोजी डेबिनाने गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव लियाना असं आहे. तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा डेबिना गरोदर होती. 11 नोव्हेंबर रोजी तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला.
2008 मध्ये ‘रामायण’ या मालिकेच्या सेटवर डेबिना आणि गुरमीतची पहिल्यांदा भेट झाली. या मालिकेत गुरमीतने राम तर डेबिनाने सीतेची भूमिका साकारली होती. डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. तसेच देबिनाने आहट, चिड़ियाघर, यम है हम, संतोषी मांसह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारून ती घराघरात प्रसिद्ध झाली.