मुंबई : दाक्षिणात्य कला जगतामध्ये सुपरस्टार्सच्या यादीत अभिनेता धनुष (Dhanush)याचंही नाव येतं. आपल्या अनोख्या अभिनय शैलीमुळं धनुष कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. पण, इथं आयुष्य़ाचा आणि सहजीवनाचा त्याचा चित्रपट मात्र सुपरहिट ठरलेला नाही. तर पुन्हा एकदा अभिनेता धनुष प्रेमात पडला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 18 वर्षांच्या नात्यानंतर धनुष आणि सुपरस्टार रजीनाकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajnikanth)विभक्त झाले.  या सेलिब्रिटी जोडीच्या विभक्त होण्याच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला होता. नेमकं त्यांच्या नात्यात इतका टोकाचा निर्णय का घेतला गेला हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करु लागला होता. मात्र आता धनुष पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची चर्चेनं सध्या सोशल मीडियावर जोर धरला आहे. 


जगप्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांच्या मोठया मुलीसोबत म्हणजेच ऐश्वर्यासोबत धनुषचं लग्न झालं. ही जोडी १८ वर्षांपासून एकमेकांसोबत संसार करत होती.  त्यांना यात्रा राजा आणि लिंगा राजा नावाची दोन मुलं देखील आहेत. मात्र लग्नाच्या १८ वर्षानंतर आता दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना मोठा धक्काच बसला. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाची अनेकांनी वेगवेगळे कारण दिले.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर, धनुषने काहीच वर्षात भरगोस यश कमावलं. त्याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. मात्र असं असलं तरीही त्याला साऊथमध्येच खास ओळख मिळाली होती.


याचबरोबर त्याचं 'कोलावरी डी' हे गाणंही प्रचंड गाजलं. या गाण्यामुळे त्याला बॉलीवूडमध्ये देखील खास ओळख मिळाली. रांजना या सिनेमातून त्याने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याचा रांजना सिनेमा देखील चांगलाच सुपरहिट ठरला. त्यानंतर बॉलीवूडमध्ये देखील त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांना होत होती.


त्यातच अभिनेता धनुषची अनेक अभिनेत्रीं सोबत नावं जोडली गेली. अशातच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो एका अभिनेत्री सोबत प्रचंड रोमँटिक झाला असून तिच्यासोबत गाणी गात आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बॉलीवूड अभिनेत्री एली सोबत धनुषचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडियोमध्ये  शेकोटीच्या समोर धनुष आणि एली दोघेही एकाच ब्लॅंकेट मध्ये बसल्याचं या व्हि डिओमध्ये दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री बघून त्यांच्यामध्ये काही तरी सूरु आहे असा अंदाज चाहते लावत आहेत.


मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हायरल होणारा हा व्हिडिओ अलीकडेच प्रदर्शित झालेल्या नाणें वरुवें या चित्रपटातील आहे. या चित्रपटाहून अधिक धनुष आणि एलीच्या केमि स्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली आहे.