मुंबई : अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाचं शूटिंग सुरु केलं आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पोलिसाची भूमिका साकारणार आहे. तर बॉलिवूडमध्ये 'बॅडमॅन' अशी ओळख असलेले अभिनेते गुलशन ग्रोवर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर बॅडमॅन बनण्यासाठी तयार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार हिरो साकारणार असून गुलशन ग्रोवर व्हिलनची भूमिका साकारणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बँकॉकमध्ये 'सूर्यवंशी'चं शूटिंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेबाबत घोषणा करण्यात आली होती. परंतु ही भूमिका कोण साकारणार याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. मात्र आता चित्रपटातील व्हिलनच्या भूमिकेसाठी गुलशन ग्रोवर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. गुलशन ग्रोवर यांनी याआधीही अनेकदा नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. आता पुन्हा एकदा ते 'बॅडमॅन' म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


'सूर्यवंशी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे अक्षय स्टंट करतानाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 




'सूर्यवंशी'मधून रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाबाबत मोठी चर्चा होती. अक्षय कुमार एटीएस चीफ वीर सूर्यवंशी यांची भूमिका साकारणार आहे. तर कतरिना कैफ त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. गुलशन ग्रोवर आणि अक्षय कुमार यांनी हेरा फेरी, खिलाडियों के खिलाडी या चित्रपटातून काम केलं आहे. आता पुन्हा ही जोडी काय कमाल करते हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.