Actor Harish Magon Death: बॉलिवूड अभिनेता हरीश मॅगन यांचे निधन झाले आहे. 1 जुलै रोजी वयाच्या 76 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या निधनाच्या दोन दिवसांनंतर त्याची माहिती समोर आली. त्यांच्या निधनाचे नक्की कारण काय हे अजून समोर आलेले नाही. हरीश मॅगन यांनी 'गोल माल', 'नमक हलाल' आणि 'इनकार' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हरीश यांच्या कुटुंबात आता त्यांची पत्नी, मुलगा सिद्धार्थ आणि एक मुलगी असून तिचं नाव आरुषी असं आहे. आरुषी सिंगापुरमध्ये राहते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरीश मॅगन यांची एक अॅक्टिंग इंस्टीट्यूट  होती. या इंस्टीट्यूटचे नाव त्यांच्याच नावावर होते. ही इंस्टीट्यूट मुंबईच्या जुहूमध्ये आहे. याशिवाय ते रोशन तनेजाच्या अॅक्टिंग स्कूलचे इंस्ट्रक्टर होते. हरीश यांच्या निधनाची बातमी CINTAA नं ट्विटरवर दिली. त्यांनी हरीश मॅगन यांच्या निधनाची बातमी देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ही पोस्ट शेअर करत म्हणाले, "CINTAA हरीश मैगन (जून 1988 चे सदस्य) यांच्या निधनावर आमची संवेदना व्यक्त करत आहोत." एका नेटकऱ्यानं कमेंट करत 1975 साली प्रदर्शित झालेल्या 'आंधी' या चित्रपटातील गाण्यातील हरीश यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की हरीश हे भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थानातून ग्रॅज्युएट झाले होते आणि गुलजार यांच्या सहायकाच्या जवळचे मित्र होते. 90 च्या दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये हरिश मॅगन यांनी सहाय्यक भूमिकेत काम करणाऱ्या उल्लेखनीय अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव नेहमीच अग्रस्थानी होते.




हरीश मॅगन यांच्याविषयी बोलायचे झाले तर 6 डिसेंबर 1946 रोजी मुंबईतच त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1974 मध्ये पुण्यातील FTII मध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी आजवर चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले. हरीश हे अनेक काळापासून सिनेसृष्टीपासून दूर होते. हरीश मॅगन हे 1988पासून असोसिएशनचे सदस्य होते. त्यात 'नमक हलाल', 'चुपके चुपके', 'खुशबू', 'इनकार', 'मुकद्दर का सिकंदर', 'गोल माल' आणि 'शहंशाह' हे चित्रपट आहेत. हरीश मॅगन यांचा अखेरचा चित्रपट हा 'उफ! ये मोहब्बत' हा होता. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता.