मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. शिवाय सतत फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत ती चर्चेत असते. आता देखील सुझानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यावेळी सुझानने मुलांसोबत फोटो शेअर केला आहे. सध्या तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुझान खानचा मोठा मुलगा रेहानने नुकतेच आपला 16 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा एक फोटो सुझानने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सुझानचा मोठा मुलगा वडील हृतिक रोशनपेक्षाही प्रचंड हँडसम दिसतो.



महत्त्वाचं म्हणजे, आज हृतिक आणि सुझान विभक्त झाली असले तरी, दोघे कायम मुलांसाठी एकत्र येतात. . सुझान आणि ऋतिकचा घटस्फोट झाला असला तरी त्यांना नेहमी त्यांच्या मुलांसोबत स्पॉट करण्यात येतं. सुझान आणि ऋतिक आजही चांगले मित्र आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, सुझान बिग बॉस 14चा स्पर्धक अली गोनीचा भाऊ अर्सलान गोनीली डेट करत आहे. तर हृतिक रोशन सबा आझादला डेट  करत असल्याचं कळत आहे. दोघांचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.