Mahhi Vij Trolled Lipstick: बॉलिवूडप्रमाणे अनेक टेलिव्हिजन सेलिब्रेटीही सोशल मीडियावर (Celebs Trolled) ट्रोल होत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे माही विज. टेलिव्हिजन आणि ओटीटी अभिनेता जय भानूशाली (Jay Bhanushali on Tara Wearing Makeup) यांच्यासोबत माहीचं 12 वर्षांपुर्वी लग्न झाले आहे आणि त्या दोघांनाही तारा नावाची एक लहान गोंडस मुलगीही आहे. मध्यंतरी माही. जय आणि तारानं भारती सिंगच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. त्यावेळी तारा लिपस्टिक आणि आयलायनर लावले होते. तेव्हा माही आणि जय ट्रोल झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 वर्षाच्या मुलीला तुम्ही लिपस्टिक आणि आयलायनर कसे काय लावू शकता म्हणून त्या दोघांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. यानंतर त्याची प्रचंड चर्चा झाली होती. परंतु याच मुद्द्यावर ताराचे वडिल जय भानुशाली यानं उत्तर दिले आहे. (actor jay bhanushali reacts on mahi vij trolling and opens up about why he allow his daughter tara to wear makeup)


नक्की काय घडला प्रकार? 


यावेळी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात जयसोबत तारानं लिपस्टिक (Lipstick) आणि आयलाईनर लावलं होतं. त्यामुळे माहीला ट्रोलर्सनी ट्रोल केले होते, आता माहीच्या सपोर्टला धावू आला आहे. सध्या सगळीकडेच त्याच्या या वक्तव्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांकडून जयचे कौतुकही होताना दिसते आहे. 


जय भानूशालीचं रोखठोक उत्तर


जय भानुशालीनं ईटाईम्सच्या मुलाखतीत सांगितले की, आपल्या सर्वांनाच माहिती (Jay Bhanushali Interview) आहे की मुलींना मेकअप करायला फारच आवडतो. प्रत्येक मुलगी ही तिच्या आईला फॉलो करते. जर आई लिपस्टिक लावते तेव्हा मुलगीही आपल्या आईप्रमाणे लावायचा प्रयत्न करते. ती सोमवार ते शुक्रवार शाळेत जाते तेव्हा शाळेतील प्रत्येक नियम ती फॉलो करते परंतु जेव्हा विकेंड्ला तारा शाळेत जात नाही तेव्हा आम्ही तिला मेकअप करायला देतो आणि कधी कधी असं करायला काहीच हरकत नाही. आम्ही ताराला तिनं मेकअप लावू नये म्हणून खूप प्रयत्न केले.


जर कोणालाही काही सल्ले द्यायचे असतील तर त्यांनी ते योग्य पद्धतीनं द्यावेत. आम्ही त्यांचा आदर करू कारण आम्हाला माहितीये की आमचे फॅन्सही ताराची काळजी घेतात. पण ते फारच नकारात्मक असतात तेव्हा मात्र मी व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. मी त्यांना त्यांच्याच भाषेत रिप्लाय देतो. माझा परिवार मला या गोष्टींकडे दुर्लेक्ष करावयास सांगतो परंतु मी मात्र त्यांना माझ्या भाषेत उत्तर देतो.