स्टॅम्प ड्यूटीमध्ये कपात झाल्यानंतर करिश्माने असा घेतला फायदा
करिश्माने काही दिवसांपूर्वी डिजिटल विश्वात एन्ट्री केली आहे.
मुंबई : स्टॅम्प ड्यूटीमध्ये कपात झाल्यानंतर करिश्मा कपूरने तिचा खारमधील फ्लॅट विकला आहे. स्टॅम्प ड्यूटी कमी झाल्यानंतर अनेक उद्योगपतींनी आणि सेलिब्रिटींनी घर विक्री करून स्टॅम्प ड्यूटीमध्ये कपात झाल्याचा फायदा घेतला आहे आणि आता या व्यक्तींमध्ये करिश्माचा देखील समावेश झाला आहे. करिश्माने तिचं खारमधील घर 10.11 कोटी रूपयांना विकले आहे. या घरासाठी करिश्माने 20.22 लाख रूपये स्टाम्प ड्यूटी भरली.
करिश्माने खारमधील दहाव्या मजल्यावरील घर विकलं आहे. यासंबंधी माहिती झॅपकी डॉट कॉ़मने प्रसिद्ध केली आहे. आभा दमानी नावाच्या व्यक्तीने हे घर विकत घेतलं आहे. मुंबईच्या
पॉश भागात हे अपार्टमेंट आहे. अपार्टमेंटमध्ये कारसाठी दोन पार्किंग आहे.
करिश्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, करिश्माने काही दिवसांपूर्वी डिजिटल विश्वात एन्ट्री केली आहे. एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या माध्यमातून तिने डिजिटल विश्वात पदार्पण केलं आहे. 'मेंटलहूड' असं या सीरिजचं नाव होतं.
या सीरिजनंतर तिच्या कामाचं सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. त्याचप्रमाणे ती आता दिग्दर्शक करण जोहकरच्या बहुप्रतिक्षीत 'तख्त' चित्रपटात देखील करिश्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.