हेल्मेट न घालता बाईक चालवणार्या `या` अभिनेत्याला पोलिसांनी ठोठावला दंड
मुंबई ट्रॅफिक पोलिस वाहन चालकांना सुरक्षित वाहनं चालवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.
मुंबई : मुंबई ट्रॅफिक पोलिस वाहन चालकांना सुरक्षित वाहनं चालवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.
अनेक सेलिब्रिटी या उपक्रमामध्ये सहभागी झाली होते. सेलिब्रिटींच्या ग्लॅमरचा वापर करून या बाबत जागृतता पसरवताना सेलिब्रिटींनाही सारखाच नियम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता वरूण धवनने भर रस्त्यामध्ये त्याच्या फॅनसोबत गाडीतून सेल्फी क्लिक केला होता. तेव्हा त्यालाही पोलिसांनी फटकारले होते. आता वरूण पाठोपाठ कुणाललाही दंड ठोठावला आहे.
कुणाल खेमूलाही हटकले
मुंबईत कुणाल खेमू हेल्मेट न घालता मोटारसायकल चालवत होता. यानंतर कुणाल खेमूला 500 रूपयांचे ई चलान पाठवण्यात आले. यानंतर कुणाल खेमूने त्याची चूक मान्य करून तात्काळ सोशल मीडियावर माफी मागितली.
ट्विटर युजरने पोलिसांचे वेधले लक्ष
अनिल कश्यप नावाच्या एका यूजरने ट्विटरवर मुंबई पोलिसांना कुणाल खेमूचे काही फोटो टॅग केले. या फोटोंमध्ये कुणालला टॅग केले. तो शिक्षेला पात्र आहे अशा आशयाचे ट्विट केले. या प्रकारानंतर कुणाल खेमूला पोलिसांनी तात्काळ 500 रूपयाचं ई चलान दिले.
कुणाल खेमूने मागितली माफी
ट्विटरवर कुणाल खेमूने आपली चूक मान्य केली. त्यानंतर बाईक राईड हा माझा आवडीचा छंद आहे. मी नियमित हेल्मेट घालून बाईक राईड करतो. मी माफी मागतो अशाप्रकारे रस्त्यावर हेल्मेट न घालता गाडी चालवून चूकीचं उदाहरण ठेवू इच्छित नाही.
पोलिसांचा खास मेसेज
तुझं बाईकवर प्रेम आहे आणि आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष आहोत.