23 वर्षांहून लहान प्रेयसीसोबत अभिनेत्याचा रोमँटिक फोटो व्हायरल
त्याचं काळीज कोणासाठी धडधडतंय पाहिलं का?
मुंबई : काही चेहरे हे बऱ्याच कारणांनी चर्चेत असतात. अभिनेत्यांच्या बाबतीतही असंच काहीसं असतं. काही अभिनेते हे त्यांच्या रुबाबदार अंदाजामुळे, काही स्मितहास्यामुळे तर काही त्यांच्या अस्तित्वामुळे चाहत्यांच्या मनाक कायमचं घर करुन जातात. अशा अभिनेत्यांमध्ये येणारं एक नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
बरं, प्रसिद्धीही अशी की दिवसागणिक वाढतच चालणारी. वयाच्या 47 व्या वर्षीही हा अभिनेता तितकाच लोकप्रिय आहे जितका तो त्याच्या ऐन तारुण्यात होता.
सध्या हा अभिनेता त्याच्या 23 वर्षांहून लहान प्रेयसीसोबत काही निवांत क्षण व्यतीत करत आहे.
त्याच्या या सुट्टीतील क्षणांचे काही फोटोही सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. हा अभिनेता म्हणजे लिओनार्दो दिकॅप्रिओ.
'टायटॅनिक' या चित्रपटापासून लिओनार्दो हे नाव चाहत्यांच्या ओठावर आलं ते आजपर्यंत कायमच आहे.
सध्या लिओ आणि त्याची प्रेयसी, अमेरिकन मॉडेल कॅमिलो मोरोनी व्यग्र वेळापत्रकातूनही एकमेकांना वेळ देताना दिसत आहेत.
समुद्राच्या पाण्यामध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज सर्वांच्याच नजरा वळवत आहे.
सेंट बार्टस येथे ही जोडी सुट्टीसाठी गेली खरी, पण तिथेही माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्यांना हेरलंच.
पाहता पाहता त्यांचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. जिथे कॅमिला काळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये लिओला मिठी मारत असल्याचं दिसली.
2017 पासून एकत्र
असं म्हटलं जातंय की, लिओ आणि कॅमिला 2017 पासून एकत्र आहेत. पण, अद्यापही नात्याबाबत मात्र दोघांनीही गोपनीयता राखलेली आहे.
वयाचं अंतर महत्त्वाचं नाही...
लिओनार्दो आणि कॅमिला या दोघांमध्येही वयाचं मोठं अंतर आहे. पण, प्रेम करताना वयाचा आकडा पाहिला जात नाही, असं खुद्द कॅमिलानं एका मुलाखतीत म्हटलं होतं.
आपल्या वक्तव्याला आधार देत तिनं काही जोड्यांची उदारहणंही दिली होती. तिचं हे वक्तव्य पाहता काहीतरी नक्कीच शिजतंय असं म्हणायला हरकत नाही...