अभिनयाचा अनुभव नसताना खोटं सांगून ऑडिशन गेला, आता आहे स्टार अभिनेता...
Milind Gawali Post: मिलिंद गवळीची सध्या जोरात चर्चा आहे. यावेळी त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याच्या या पोस्टची सर्वत्र जोरात चर्चा आहे. चला तर पाहुया त्यानं अशी कोणती आठवण सांगितली आहे.
Milind Gawali Post: 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या त्याची अशीच एक पोस्ट ही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. मिलिंद हा अनेकदा आपल्या आयुष्यातील, करिअरमधील जुन्या आठवणी आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून शेअर करताना दिसतो. सध्याही त्याच्या या नव्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या सर्वांच्या उराशी अनेक स्वप्नं असतात. त्यासाठी आपण वाट्टेल ते करण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येका कलाकाराचीही प्रवास हा फारच वेगळा असतो. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे मिलिंद गवळी यांची. त्याचीही स्वप्न अशीच फार मोठी होती. सध्या त्यानं एक पोस्ट सोशल मीडियावर त्याची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये तो म्हणतो की, मैं अकेला चलता गया और कारवा बनता गया ! मी आठवीत शारदाश्रम विद्यामंदिर दादर या शाळेत असताना, कोणीतरी मला सांगितलं की फिल्म डिव्हिजनमध्ये एका बाल चित्रपटाचं कास्टिंग चालू आहे, आणि मला चांगलं आठवतं की 63 नंबरची b.e.s.t ची बस पकडून मी जसलोक हॉस्पिटलच्या समोर फिल्म्स डिव्हिजनच्या ऑफिस मध्ये पोहोचलो, इथे दोन माणसं ऑडिशन घेत होती, त्यांनी मला आत studioत बोलवलं आणि काही प्रश्न विचारले, नाव काय? पत्ता काय? राहतोस कुठे? आई वडील काय करतात? आणि यापूर्वी एक्टिंगचा काही अनुभव आहे का?
मी त्यांना सांगितलं हो आहे ! एका नाटकात मी काम केलं होतं! ते खोटं बोलणं माझ्या अंगाशी आलं, कारण लगेचच ते दोघं एकदमच म्हणाले, काहीतरी परफॉर्म करून दाखव. झाली ना माझी पंचायत! मी पण दीड शहाणा होतोच, जिद्दी ही होतोच, तिथल्या तिथे एक नाटकाचा सिन डोक्यात तयार केला आणि बोलायला सुरुवात केली, माझा परफॉर्मन्स बघून त्यांना नक्कीच कळलं असणार की हा थापा मारतो आहे.
तेव्हाच मला ही कळलं होतं की मला काही हे लोक कास्ट करणार नाहीत. पण तो सगळा प्रवास, ती जर्नी मला सुखावून गेली, ते film divisionच Office, इथे लागलेले पोस्टर्स, STUDIO ambience. या सगळ्यांनी मी भारावूनच गेलो होतो, मला हे विश्व स्वप्नावत वाटत होतं. माझ्या शाळेतल्या मित्रांचं आधीच ठरलं होतं ते मोठे झाल्यावर ते काय बनणार आहेत, जयंत कारेकर डॉक्टर, रमेश महाडीक इंजीनियर, रमाकांत घनाते चार्टर्ड अकाउंटेंट, एकदा मला माझ्या शाळेतल्या मित्रांनी विचारलं, मिल्या तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस? तू काही ठरवलं आहेस का? आणि मी सेकंड थॉट न देता उत्तर दिलं होतं, की मी ॲक्टर Actor होणार आहे !
ते सगळेच हसले होते, माझे चेष्टा केली होती, पण मी पक्का निश्चय केला होता. आपण अभिनेताच व्हायचं. यानंतर मी कोणालाही कधीही सांगितलं नाही की मला अभिनेता व्हायचं आहे. पण मनामध्ये दृढ निश्चय केला होता, हा प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे हेही मला माहित होतं, म्हणूनच म्हटलं, “मैं अकेला चलता गया और कारवा बनता है “ आज माझ्या या कारवांमध्ये माझ्याबरोबर प्रवास करायला पहाटे साडेतीन वाजता पुण्याहून ठाण्यात आलेली ही मंडळी शीतल, मिहीर, गौरव, सिद्धार्थ, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.'', अशी आठवण त्यानं यावेळी शेअर केली आहे.