कोलकाता प्रकरणावर पोस्ट केल्यामुळे अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, पाठवले अश्लील मॅसेज
कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकलं आलं. या प्रकरणावर अनेकजण आपला संताप व्यक्त करत आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला बलात्काराची धमकी मिळाली आहे.
कोलकाताच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर डॉक्टरांनी निदर्शने केली होती. आता या प्रकरणावर सीबीआय चौकशी केली जाणार आहे. या सगळ्या दरम्यान आता तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांना मंगळवारी कोलकाता प्रकरणावर पोस्ट केली होती. आता मिमी चक्रवर्तीला बलात्काराची धमकी आणि अश्लिश मॅसेज पाठवून धमकी दिली जात आहे. मिमीने याबाबत एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे. यामध्ये तिने कोलकाता पोलीस सायबर सेल विभागाला टॅग केलं आहे.
मिमी चक्रवर्ती 2019 ते 2024 पर्यंत जादवपुर लोकसभा विभागातील खासदार होती. अभिनेत्रीने कोलकाता डॉक्टर प्रकरणाविरोधात केल्या जाणाऱ्या आंदोलनात आपली उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये मिमीसोबतच ऋद्धि सेन, अरिंदम सिल आणि मधुमिता सरकार यासारख्या अभिनेत्री देखील सहभागी होत्या. 14 ऑगस्टला कोलकाता डॉक्टर प्रकरणावर आंदोलन करण्यात आले होते.
मिमी चक्रवर्तीला मंगळवारी, 20 ऑगस्ट रोजी सांगितले की, जेव्हापासून तिने कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली तेव्हापासून तिला बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. अश्लील मेसेजही पाठवले जात आहेत.
मिमीने विचारला प्रश्न ?
अभिनेत्रीने सोशल मीडियावर अशा मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. मिमीने त्यासोबत लिहिले, '...आणि आम्ही महिलांसाठी न्याय मागतोय ना? हे त्यापैकी काही आहेत. जिथे गर्दीत उपस्थित मुखवटाधारी लोकांकडून बलात्काराच्या धमक्या येणे सामान्य झाले आहे. अशा लोकांचे संगोपन आणि त्यांची शिक्षा यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण
कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात दररोज नवं नवं खुलासे होत आहे. या प्रकरणाचा तपास CBI कडे असून ते या प्रकरणात कसून चौकशी आणि शोध घेत आहेत. या घटनेच्या वेळी महिला डॉक्टर ही सेमिनार हॉलमध्ये झोपण्यासाठी गेली होती. नीरज चोप्राचा सामना पाहिल्यानंतर ती खोलीमध्ये न जाता सेमिनार हॉलमध्ये का झोपण्यासाठी गेली? असा प्रश्न सीबीआयला पडला होता. या प्रश्नाच उत्तर शोधण्यात सीबीआयला यश मिळालंय