पूनम पांडेचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे? चर्चांना उधाण
पूनम पांडेचा मृत्यू सर्विकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) झाल्याचे बोललं जात आहे.
Poonam Pandey Drug Overdose : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली होती. पूनम पांडेच्या आकस्मित निधनाने बॉलिवूड कलाकारंसह चाहत्यांनाही धक्का बसला होता. पूनम पांडेचा मृत्यू सर्विकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) झाल्याचे बोललं जात आहे. पण आता तिच्या मृत्यूमागचे नवीन कारण समोर आले आहे.
2 फेब्रुवारी रोजी सकाळी, इंस्टाग्रामवर एका पोस्टने पूनम पांडेच्या चाहत्यांना धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या मॅनेजरनेही पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 2 फेब्रुवारी 2024 ला एक बातमी शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये तिच्या निधनाची धक्कादायक बातमी देण्यात आली. "आजची सकाळ आमच्यासाठी फार कठीण होती. तुम्हाला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, आपण पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे. या दु:खाच्या काळात, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी विनंती आहे", असे त्यात म्हटले होते.
आता पूनम पांडेच्या मृत्यूचे कारण वेगळं असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता 'टाईम्स नाऊ' या वेबसाईटने सूत्रांच्या आधारावर दिलेल्या माहितीनुसार, पूनम पांडेचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याची माहिती समोर आली होती. पण आता तिचा मृत्यू ड्रग्जचा ओव्हर डोसमुळे झाला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण तिने कोणत्या प्रकारचे ड्रग्ज घेतले होते, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
दरम्यान पूनम पांडेचा जन्म 11 मार्च 1991 रोजी कानपूरमध्ये झाला होता. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. तिने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अखेरची 'द जर्नी ऑफ कर्मा' या चित्रपटात दिसली होती. मॉडेल, अभिनेत्री असणारी पूनम पांडे नेहमीच वादग्रस्त राहिली. कधी आपली विधानं तर कधी बोल्ड कपड्यांमुळे ती नेहमीच वादात अडकली. पूनमने 'खतरों के खिलाडी 13' आणि कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती.
पूनम पांडेने उत्तर प्रदेशमधील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. तिच्या मॅनेजरने झूमशी संवाद साधताना तिचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तिच्या पीआर टीमनेही दुजोरा दिला असून लवकरच प्रेस रिलीज जारी करणार असल्याचे सांगितले.