मुंबई : हिंदी चित्रपट जगतातील ज्येष्ठ आणि नामवंत अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्ता आल्यानंतर तालिबान्यांचं समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबानच्या या विजयावर आनंद साजरा करणं भयंकर आणि धोकादायक आहे, अशा शब्दांत त्यांनी तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना धारेवर घेतलं. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी भारतीय इस्लाम धर्माबाबत माहिती दिल्याचं पाहायला मिळालं. भारतीय मुस्लिमांनी स्वत:ला प्रश्न विचारावा की, ते आपल्या धर्मात सुधारणा आणू इच्छितात की जुन्याच रुढींसह राहू इच्छितात, असं ते म्हणाले आहेत. 


अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता प्रस्थापित होणं ही भयंकर बाब आहे तसंच भारतीय मुस्लिमांकडून त्यांच्या परतण्यावर आनंद साजरा करणं हीसुद्धा भयंकर धोक्याची बाब आहे, असं शाह म्हणाले. 


Sidharth Shukla Death: मृत्यूबाबत हे काय म्हणाला सिद्धार्थ; का करत होता असा विचार? 


 


मी भारतीय मुस्लिम आहे आणि जसं मिर्झा गालिब सांगून गेले आहेत, माझं अल्लाहशी असणारं नातं 'बेतकल्लुफ' आहे. मला सत्तेच्या राजकारणाची काहीच गरज नाही. भारतीय इस्लाम जगभरातील इस्लामपेक्षा वेगळा आहे. आणि खुदा ती वेळ न आणो की हा इस्लाम इतका बदलले जो ओळखताही येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी चिंता व्यक्त केली.