मुंबई : चित्रपटाचा चेहरा असणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्रींबद्दल सांगावं तर, काही कलाकारांवर निर्माते दिग्दर्शकांचा अमाप विश्वास असतो. अशाच कलाकारांना त्यांच्या कामासाठी मोबदल्याच्या स्वरुपात मोठी रक्कम दिली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकप्रियता आणि मानधनाच्या बाबतीत यादीमध्ये अग्रेसर असणाऱ्या कलाकारांच्या यादीच अभिनेता प्रभास याच्याही नावाचा समावेश आहे. 


'बाहुबली', या चित्रपटामुळे प्रभासचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं. फक्त दाक्षिणात्य चित्रपटप्रेमीच नव्हे, तर विविधभाषी प्रेक्षकांचीही त्याला पसंती मिळाली. 


हाच प्रभास आता त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं भल्याभल्यांना मागे टाकत आहे. 


कारण ठरतंय ते म्हणजे त्याला मिळणारं मानधन. काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार प्रभासला त्याच्या आगामी 'आदिपुरुष' आणि 'स्पिरिट' या चित्रपटांसाठी एकदोन नव्हे, तब्बल 150 कोटी रुपये इतकं मानधन मोजलं गेलं आहे. 


मागील 10 वर्षांमध्ये सलमान खान आणि अक्षय कुमार या कलाकारांमागोमाग मानधन स्वरुपात इतकी मोठी रक्कम घेणारा प्रभास हा तिसरा अभिनेता ठरत आहे. 


प्रभासचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काळात तो 'राधे श्याम' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री पूजा हेगडे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.