शाळेतली शिक्षिका होती प्रभासचं पहिलं प्रेम
‘बाहुबली’ या सिनेमातील अभिनेता प्रभास याने त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ‘बाहुबली २’ सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
मुंबई : ‘बाहुबली’ या सिनेमातील अभिनेता प्रभास याने त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ‘बाहुबली २’ सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
मात्र त्यांनी यावर नकार दिला होता. आता प्रभासने त्याचं पहिलं प्रेम कोण होतं, याचा खुलासा केलाय.
'लहानपणी मला गावातील मुली फार आवडायच्या. थोडा मोठा झालो तेव्हा मला लांब केसाच्या मुली आवडू लागल्या. मग हुशार आणि उंच मुलींकडं मी आकर्शित झालो. पण माझं पहिलं प्रेम होती माझ्या शाळेतली शिक्षिका. तिला बघून मी अभ्यास विसरून जायचो,' असं 'बाहुबली'फेम अभिनेता प्रभास यानं सांगितलं.
अनुष्का शेट्टीबद्दल त्याने सांगितले की, 'अनुष्का आणि मी गेल्या ९ वर्षांपासून फॅमिली फ्रेण्ड आहोत. आम्ही चांगले मित्र आहोत. अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. पण अधूनमधून आमच्यातील अफेअरच्या चर्चा ऐकायला मिळतात. एखाद्या अभिनेत्रीनं एकाच अभिनेत्यासोबत एकापेक्षा जास्त चित्रपट केले की त्यांची नाव एकमेकांशी जोडली जातात. पण सातत्यानं होणाऱ्या या चर्चा ऐकून खरंच आमच्यात काही आहे की काय? असं मला वाटायला लागतं,' असं प्रभास गमतीने म्हणाला.