`दोन दिवस टोमॅटो महाग, मीडियात लईच आग लागलीये``, लाल चिखल म्हणत प्रवीण तरडे यांनी लिहिलेली पोस्ट एकदा वाचाच
Pravin Tarde : प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी टॉमेटोचे वाढते दर पाहता एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान, अनेकांनी प्रविण तरडे यांच्या पोस्टवर कमेंट करत पोस्ट शेअर केली आहे.
Pravin Tarde : आज बाजारात टॉमेटो दिसले तरी ते घेण्यासाठी कोणी पुढे जात नाही. आजा आई भाजी बनवताना पण टॉमेटो न घालता बनवते. टॉमेटो नसल्यामुळे भाजीची चव किती बदलते हे सांगण्याची गरज नाही. आता सगळ्यांना टॉमेटोची खरी किंमत कळली असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा कोणत्याही भाजीची किंवा पिकाचा भाव वाढला की शेतकऱ्यांना फायदा होतो. पण हे नेहमीच होतं असं नाही कारण जेव्हा पिकाची किंमत कमी होते तेव्हा त्याला पाठिंबा देत कोणी पुढे येत नाहीत. तर भाव वाढले की लगेच इतरांनी चिडचिड किंवा चिंता वाढते. दरम्यान, शेतकऱ्यांना पाठिंबा देत अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी शेतकऱ्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रविण तरडे यांच्या या पोस्टनं ते शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. इतकंच नाही तर मॅकडॉनल्डनं देखील काही ठिकाणांहून टॉमेटो त्यांच्या डिशमधून काढून टाकलं आहे. प्रविण तरडे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रविण तरडे म्हणाली "दोन दिवस टोमॅटो महाग झालाय तर मीडियात लईच आग लागलीये.. इथं वर्षभर भाव मिळत नाही म्हणून सडून जातो तेव्हा सगळे गप्पगार.. #लाल चिखल" या पोस्टमधून प्रविण तरडे यांनी टॉमेटोचे दर वाढल्यामुळे त्यावर सतत होणाऱ्या चर्चेवर चोख उत्तर दिलं आहे.
प्रविण तरडे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, "सध्या आमचा अर्धा एकर टमाटर आहे ...चांगले पैसे मिळत आहेत." दुसरा नेटकरी म्हणाला, "बरोबर तेंव्हा कवडीमोल भावाने घेऊन शेतकर्यांना लुटतात." तिसरा नेटकरी म्हणाला, "तुम्ही बोललात त्याला माझा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांना भाव मिळालाच पाहिजे, अन्न दाता सुखी भव." आणखी एक नेटकरी म्हणाला, "या महाग टोमॅटोंमधले खूपच कमी पैसे शेतकऱ्यांना मिळतात, हे खरे दु:ख आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "रोजचं रडगान आहे कोणालाही शेतकऱ्या विषयी आपुलकी नाही आज आज दर वाढले की बजेटवर बोलतात ज्या शेतकऱ्यांना पिकवले त्याला किती दर मिळाला ही कोण विचारणार." तिसरा नेटकरी म्हणाला, "तरडे सर आपण चांगला विषय शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय हाती घेतला धन्यवाद मनापासून आभार"