मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक रणजीत आजकाल चित्रपटांपासून दूर आहेत. मात्र ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि वेळोवेळी चाहत्यांशी संवाद साधतात. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत आपल्या फिल्मी करिअरबद्दल मोकळेपणाने आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की, चित्रपटांमध्ये केलेल्या बलात्काराच्या सीनमुळे माझी प्रतिमा खूप खराब झाली आहे. आणि त्यांचा असाही विश्वास आहे की, या सीनमुळेच त्यांना त्यांच्या कारकिर्दीत फारसं यश मिळालं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलींच्या लहान कपड्यांनी त्यांची कारकीर्द उद्ध्वस्त केली 
रणजीत पुढे म्हणाले, 'त्या दिवसांत बलात्काराची सीन्स वल्गर नव्हते. माझं काम असं होतं की, काही नायिका माझ्याबरोबर असे सीन्स द्यायला कमर्फटेबल असाव्यात. नंतर लोकांनी मला बलात्कार विशेषज्ञ देखील म्हणण्यास सुरुवात केली. त्यावेळी, वातावरण आतासारखं नव्हतं आणि तेव्हा लव्ह सीन्स देखील नव्हते. 


आमच्याकडे एक संच स्वरूप होतं. नायक, नायिका, विनोदी कलाकार, खलनायक, बहीण, आई आणि भाऊ. जर यापेक्षा जास्त असेल तर असं म्हटले होतं की जर तुम्हाला तेच करायचं असेल तर ब्लू फिल्म बनवा? ' रणजीत पुढे म्हणाले, 'मी नेहमी विनोद करायचो की फॅशनने माझं करिअर बरबाद केलं. मुलींनी असे छोटे कपडे घालायला सुरुवात केली की खेचण्यासाठी काहीच उरलं नाही.



कुटुंबाने घराबाहेर हाकलून दिलं होतं काही काळापूर्वी द कपिल शर्मा शोमध्ये दिसलेल्या रणजित यांचे विनयभंगाचे सीन पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना कसं घरा बाहेर काढलं याचा खुलासा केला होता. रणजीत म्हणाले की, त्यांचं कुटुंब लाजाळू होतं. आणि त्यांच्या कामावर नाखूष होते. मग कुटुंबाने मला सांगितलं, "हे काही काम आहे का? मेजर, ऑफिसर, एअरफोर्स ऑफिसर किंवा डॉक्टरची भूमिका बजावा. वडिलांचं नाक कापलं गेलं आहे. कोणत्या तोंडाने आपण आता अमृतसरला जायचं.